शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदाला मिळाले ४ हजार कोटी रुपये

By admin | Updated: May 26, 2016 01:22 IST

जलसंपदा विभागाला या वर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ४२१७ कोटींचा निधी आज वितरित करण्यात आला असून गतवर्षीच्या तरतुदीतील ७२७२ कोटींसह गेल्या पाच

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

जलसंपदा विभागाला या वर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ४२१७ कोटींचा निधी आज वितरित करण्यात आला असून गतवर्षीच्या तरतुदीतील ७२७२ कोटींसह गेल्या पाच महिन्यांत या विभागाला ११४८९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आता ‘निधीअभावी प्रकल्प रखडले’ ही सबब सिंचन विभागाला सांगता येणार नाही. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला जानेवारी महिन्यात गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ७२७२ कोटी रुपये दिले होते. तर आज २५ मे रोजी केंद्र शासनाच्या योजनांसाठीचा राज्याचा हिस्सा ९५४ कोटी आणि राज्याने केलेल्या तरतुदीपोटी ३२६३ कोटी असा ४२१७ कोटींचा निधी वितरित केला. या निधीतून कृष्णा खोरे महामंडळास ६७0.५३ कोटी, गोदावरी मराठवाडा महामंडळास ७६६.४१ कोटी, विदर्भ पाटबंधारे महामंडळास २११३.८0 कोटी, तापी पाटबंधारे महामंडळास ४६८.२0 कोटी आणि कोकण पाटबंधारे महामंडळास १९८.२४ कोटी रुपये मिळाले आहेत.चालू आर्थिक वर्षात जलसंपदा विभागासाठी ७८५0 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ४२१७ कोटी रुपये आजच पाच महामंडळांना मिळाले आहेत. वर्ष पूर्ण होण्याच्या आत आणखी ३६३३ कोटी रुपये पाच महामंडळांना मिळणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीतील सर्व निधी वर्षाअखेर जलसंपदा विभागाला मिळणार असल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.जलसंपदा विभागाला वेळेवर निधी न मिळाल्याने अनेक प्रकल्प रखडले, त्यांच्या किमती वाढल्या. एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाने पळवला या गोष्टी पुन्हा घडू नयेत म्हणून मंजूर करण्यात आलेला सगळा निधी वेळेच्या आत देण्याचा निर्णय वित्त विभागाने जाणीवपूर्वक अमलात आणला आहे.- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्रीनिधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण निधी देऊन ते प्रकल्प पूर्ण करणे हे आमच्या विभागाचे उद्दिष्ट आहे. निधीचा पूर्ण वापर करून सिंचन क्षमतेत वाढ करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री