शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

खारघर शहरात पाण्याची समस्या

By admin | Updated: April 6, 2017 02:39 IST

खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे.

पनवेल : खारघर शहरात मागील महिन्याभरापासून तीव्र पाण्याची समस्या उद्भवली आहे. शहराला ७० ते ७५ एमएलडी पाण्याची गरज असताना सिडकोमार्फत केवळ ५० एमएलडी पाण्यावर बोळवण केली जाते. सातत्याने पाठपुरावा करूनसुध्दा ही समस्या जैसे थेच असल्याने खारघरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला स्वत:च पाणी सोडले. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच सिडको अधिकाऱ्यांनी तातडीने हा पाणीपुरवठा बंद केला.खारघर शहरात सर्वच वसाहतीत पाण्याची समस्या गंभीर होत असताना सिडको प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. विशेष म्हणजे सिडकोने महानगर पालिकेला जलवाहिन्या टाकण्यासाठी जागा देताना करार केला आहे क ी, जेव्हा सिडको विभागात पाण्याची गरज भासेल तेव्हा आम्ही सिडकोच्या संबंधित विभागाला पाणीपुरवठा करू. मात्र, हा करार केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केला. खारघर शहरातून जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून खारघर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभात पाणी सोडले. विशेष म्हणजे अनेक वर्षे होऊन देखील या ठिकाणाहून खारघर शहराला पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. या जलवाहिनीवर असलेला व्हॉल्व सुरू करून या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करून भाजपा कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये भाजपा जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, समीर कदम, कीर्ती नवघरे तसेच विजय पाटील यांचा समावेश होता. खारघर शहरात पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या समस्यांचा परिणाम कुटुंबाच्या बजेटवरच होत असल्याने खारघरमधील रहिवाशांसाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. आमच्यावर प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकारासंदर्भात नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जसवंत मिस्त्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे येत्या काळात खारघर परिसरातील पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)