शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी

By admin | Updated: May 13, 2016 05:00 IST

भ्रष्टाचार टाळण्यास बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून तसा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवण्यात येणार आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबई धरणातील कालव्याद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय, चोरी व कामांतील भ्रष्टाचार टाळण्यास बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून तसा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा दिला असून हा निर्णय अंमलात आला तर राज्याचा सिंचन नकाशाच बदलून जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जलसंपदा विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजमितीला राज्यात लागवडीलायक क्षेत्र २२५ लक्ष हेक्टर एवढे आहे. त्यापैकी भूपृष्ठावरील पाण्यातून (धरण, कालवे, तलाव, नदी) ८५ लक्ष हेक्टर, तर भूजल पाण्यातून ४१ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. उर्वरित ९९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास भगीरथ प्रयत्नही अपुरे पडतील. त्यामुळे यापुढे कालव्यांद्वारे नव्हे, तर पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने आखले आहे. जिथे धरण बांधून तयार आहे पण कालवे झाले नाहीत, तसेच नव्या धरणांसाठी पाइपलाइनचा पर्याय पुढे आला आहे. ज्या ठिकाणी सपाट जमीन आहे अथवा जिथे पाणी पाइपलाइनद्वारे नेणे अशक्य आहे, अशा ठिकाणी मात्र कालव्यांची मदत घेतली जाणार आहे.कालव्यांमुळे भवतालच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास काही प्रमाणात मदत झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर जमीन नापिक झाली आहे. तसेच क्षारामुळे जमिनीचा कस कायमचा गेला आहे. कालव्यांवर मोटारी बसवून कोणतेही मोजमाप न करता पाणी पळवण्याचे प्रकार सररास घडतात. कालवे फोडून पाणी पळवण्याच्या घटनाही राज्यात घडलेल्या आहेत.