शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:13 IST

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधीलही पाणीकपात रद्द व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरात दररोज पाणीपुरवठा करावा, याबाबत महापालिका सभेतही निर्णय होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मागील पावसाळ्यात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. धरणातील पाणीसाठा घटतच असल्याने २ मे २०१६पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पवना धरणात ७८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यासह मावळ परिसरात जोरदार पाऊसही सुरूच आहे. यामुळे तीन महिन्यांपासून होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून दररोज पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेले वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा सहन करीत असलेल्या पुणेकरांना आता दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निर्णय, आयुक्तांचे पत्र यावरून हा निर्णय घेण्यात आला. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सभेत नगरसेवक काय भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आयुक्तांनी मात्र सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल भोसले व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी आयुक्त दिनेश वाघमार यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षी कमी पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाचे प्रमाण चांगले आहे. दमदार पाऊस सुरूअसल्याने पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)