शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणामुळे टंचाई निवारण शक्य

By admin | Updated: March 6, 2017 02:18 IST

जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले.

नारायणपूर : जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन जलसंधारणाची मोहीम राबवून गावे टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करावीत, असे आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी यांनी केले. तसेच पानवडी गावाने एकजुटीने केलेल्या कामाचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. पानवडी येथील पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यात केलेल्या जलसंधारणाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी आणि रूपक चौधरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसंधारणाच्या कामाबरोबरच इतर कामाचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, प्रांताधिकारी संजय आसवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भोसले, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती लोळे, सुषमा भिसे, अनिता लोळे, मंगल धीवार, आबा लोळे, सोसायटी चेअरमन रामदास भिसे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ, काळदरीचे ग्रामसेवक शशांक सावंत, कृषी पर्यवेक्षक दिलीप जाधव, गंगाराम जाधव , तंटामुक्ती अध्यक्ष अमोल लोळे उपस्थित होते. या वेळी राजे शिवराय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यामातून आणि पारंपरिक ढोल-लेझीम खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पथकाने वडाचीवाडी स्मशानभूमी लगतच्या सिमेंट बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन केले. तसेच भिसेवाडी येथील तलावातील गाळ काढलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत सदस्या सुषमा भिसे, रामदास भिसे, सायली भिसे यांनी आपल्या मनोगतात गावात राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)>३५ जिल्हे : फक्त पुण्याची निवडजलसंधारणाबरोबरच गतिमान प्रशासन चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल संपूर्ण राज्यातील ३५ जिल्ह्यांतून एकमेव पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढील टप्प्यात संपूर्ण देशातून निवड करण्यात येणार असून, उत्कृष्टपणे विकासकामे करून आदर्श ठरणाऱ्या गावांना पंतप्रधान कार्यालयामार्फ त पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील कामांची पाहणी करण्यात आल्याचे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.