शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर ‘वॉच’

By admin | Updated: August 16, 2016 05:17 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह इब्राहिम-पारकरचे मुंबईतील नागपाडा परिसरात लग्न पार पडणार आहे, तर जूहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह इब्राहिम-पारकरचे मुंबईतील नागपाडा परिसरात लग्न पार पडणार आहे, तर जूहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार आहे. यात दाऊद स्वत: उपस्थित राहणार नाही. मात्र, तो स्काइपद्वारे लग्न पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या लग्नासाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांसह मुंबई पोलिसांची करडी नजर या लग्नावर असणार आहे.नागपाडा येथील गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये अलिशाह वास्तव्यास आहे. तो दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा लहान मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी डोंगरी परिसरात हसिना पारकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर गवळी गँगच्या गँगवारमध्ये अलिशाहचे वडील इब्राहिम पारकर यांची हत्या झाली होती. अलिशाह राहत असलेला फ्लॅट हसिनाच्या नावावर आहे. अलिशाहच्या लग्नपत्रिकेनुसार, १७ आॅगस्ट रोजी त्याचे लग्न पार पडणार आहे. नागपाडा येथील तेली मोहल्ल्यात सकाळी ११ वाजता आयेशा नामक मुलीसोबत त्याचे लग्न होणार आहे. आयेशा एका व्यावसायिकाची मुलगी आहे. त्यानंतर, रात्री ९ वाजता जुहू येथील ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. लग्नसराईच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विशेष बंदोबस्त ठेवल्याचे समजते. या सोहळ््यात निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मीडिया प्रतिनिधींनी आतमध्ये शिरू नये, म्हणून बाउंसरचीही नेमणूक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ डिसेंबर २००४ मध्ये हसिना पारकरचा मोठा मुलगा दानिशचा मुंबईच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत लग्नसोहळा पार पडला होता. त्यामध्येही दाऊद आला नव्हता. त्या वेळी त्याला लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यात आले होते. गेल्या वर्षी हसिनाची मुलगी उमैरा हिचा विवाहदेखील वरळीच्या फेयर बँक्वेट हॉलमध्ये पार पडला होता. यामध्येही काही लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. (प्रतिनिधी)काय आहे योजना?या लग्नासाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्ह्यांतून बाहेर आल्यानंतर इक्बाल हा रियल इस्टेटचा व्यवसाय पाहात आहे. या सोहळ्यात डी-कंपनीची काही खासमखास लोक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा, गुन्हे शाखेसह मुंबई पोलिसांची येथील हालचालींवर करडी नजर राहणार आहे.