शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल लॅब’द्वारे वायुप्रदूषणावर ‘वॉच’

By admin | Updated: November 11, 2014 01:00 IST

गेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’ने

‘नीरी’चा अभिनव उपक्रम : उपराजधानीतील घातक वायूंच्या पट्ट्यांची कळणार माहितीयोगेश पांडे - नागपूरगेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’ने (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे. शहरातील कुठल्या भागात नेमके जास्त वायुप्रदूषण आहे याचा अभ्यास करण्यासाठी ‘नीरी’तर्फे विशेष ‘मोबाईल लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी युक्त अशा या छोटेखानी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शहरातील निरनिराळ्या ठिकाणी हवेतील घातक वायूंची नोंद घेण्यात येत आहे.‘नीरी’च्या संशोधकांकडून सातत्याने वायुप्रदूषण आणि त्याच्याशी निगडित निरनिराळ्या मुद्यांवर संशोधन करण्यात येते. याकरिता नेमकी आकडेवारी आवश्यक असते. संशोधकांच्या प्रयत्नातून ही ‘मोबाईल लॅब’ साकारण्यात आली. ‘मोबाईल एमिशन मॉनिटरिंग अ‍ॅन्ड कंट्रोल लेबॉरेटरी’ असे नाव असलेल्या या ‘लॅब’चे काम नागपूर तसेच शहराच्या आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रात चालते. येथील वातावरणातील निरनिराळ्या वायूंच्या घटकांची माहिती लगेच उपलब्ध व्हावी, अशी यंत्रणा यात उभारण्यात आली आहे. या अभ्यासातून कुठल्या भागात वायूप्रदूषण जास्त प्रमाणात आहे व कुठे तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता आहे, ही बाब अधोरेखित करणे शक्य झाले आहे. नागपुरातील वातावरणातील घातक वायूंचा प्रभाव कमी व्हावा, हे ‘सीएसआयआर-नीरी’चे उद्दिष्ट आहे. या ‘मोबाईल लॅब’मुळे ‘नीरी’च्या संशोधकांना अचूक व वेगवान पद्धतीने वायुप्रदूषणाचा ‘डेटा’ मिळू शकेल. तसेच वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यास मदतदेखील होईल, असे मत ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केले आहे. ‘मोबाईल लॅब’चे अत्याधुनिक अंतरंगवायुप्रदूषणाचा अभ्यास करणारी ही ‘मोबाईल लॅब’ एका छोटेखानी बसमध्ये उभारण्यात आली आहे. यातील ‘ईएमयू’ (एमिशन मॉनिटरिंग युनिट) व ‘ईसीयू’ (एमिशन कंट्रोल युनिट) हा महत्त्वाचा भाग आहे. शिवाय ‘ग्रीन हाऊस गॅसेस’, ‘सीएफसी’ (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) आणि इतर ५० प्रकारच्या घातक वायूंची तपासणी करण्यासाठी ‘एफटीआयआर’ (फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी)देखील या ‘लॅब’मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ‘फ्ल्यू गॅस अ‍ॅन्ड एमिशन मॉनिटरिंग अ‍ॅनालायझर’, ‘हीट एक्सचेंजर’, ‘मल्टी सायक्लॉन’, ‘बॅग फिल्टर’ यांचादेखील समावेश आहे. शिवाय उच्च दर्जाचे ‘फ्लेक्सी पाईप्स’देखील येथे वापरण्यात आले आहेत. चौकाचौकांत वाहनातून निघणारे घातक वायू ओढून घेण्याची क्षमतादेखील या ‘लॅब’मध्ये आहे, हे विशेष.