शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देणार

By admin | Updated: November 25, 2015 04:01 IST

कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़

सोलापूर : कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़ उद्योग आणि सांडपाणी पुनर्वापराबाबत शासन पातळीवर धोरण निश्चित केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढील दोन वर्षांत किमान ५ महापालिकांमध्ये १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली़एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनीतून पाणी घेण्यासाठी जलवाहिनी टाकली आहे़ तिचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. प्रक्रिया करूनच एनटीपीसीला हव्या त्या पद्धतीच्या गुणवत्तेचे पाणी देण्याचा निर्णय एनटीपीसीनेदेखील तत्त्वत: मंजूर केला आहे़ त्यामुळे आता मनपा आणि एनटीपीसी यांच्यात एक सामंजस्य करार होईल़ हेच मॉडेल राज्यभरात वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यास नदीचे प्रदूषणदेखील रोखता येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)हागणदारीमुक्त नगरपालिका आणि महापालिकांसाठी २ टक्के व्याजाने ३० वर्षांसाठी कर्ज देण्यासाठी एक कंपनी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले़ पुणे जिल्ह्यातील धरणांतून १० टीएमसी पाणी उजनीमध्ये सोडण्याच्या निर्णयाचे पालन होईल, असेही ते म्हणाले. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीतर्फे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केला़