शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये धुवांधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: September 23, 2016 09:36 IST

संपूर्ण बीड जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू नदी, नाले आणि ओढे फुल्ल झाले आहेत.

प्रताप नलावडे, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २३ - पहाटे तीन वाजल्यापासून संपूर्ण बीड जिल्ह्यात धुंवाधार पाऊस सुरू नदी, नाले आणि ओढे फुल्ल झाले आहेत. गावागावातील नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून शहर जलमय झाले आहे. पहाटेपासूनच ढगांचा गडगडाट आणि वीजेच्या कडकडाटाने बीडकरांना हादरवून सोडले आहे . गेली चार वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाºया जिल्हा अवघ्या चार तासात जलमय झाल्याने हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. 
 
शेतात पाणी घुसल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. 
बीड शहरातील बिंदसुरा नदी ओसंडून वाहू लागली असून धरणातील पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात बिंदसुरा धरण कोरठे ठाक च होते. शहरातील सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. वडवणी तालुक्यात पावसान कहर केला असून संपूर्ण शहरच जलमय झाले आहे. या शहराला पाणी पुरवठा करणारा मामला तलाव तुडुंब भरला आहे. तलावातून पाणी वाहू लागल्याने मामला गावाचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर शेतात गेलेले शेतकरीही तेथेच अडकून पडले आहेत.
 
परळीत नागापूर धरणातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून २८ फुट क्षमतेच्या या धरणातील पाणी पातळी २६ फुट इतकी झाली आहे. आष्टी तालुक्यात रात्रभर संततधार सुरूच असून सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. सिरसाळा परिसरात मोहा नदीला पाणी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोपला तलावही तुडुंब भरला आहे. धारूर येथे वाण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. माजलगाव परिसरात पावसाचा जोर वाढल्याने येथील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या हे धरण मृतसाठ्यात आहे. तालखेड परिसरातही रात्रभर  पळसखेडाची होळना नदीही तुडुंब भरून वाहू लागली आहे. ही नदी दुथडी वाहतानचे दृष्य तब्बल तीस वर्षांनी पाहण्यास मिळाल्याचे गावकरी सांगतात. पाऊस सुरूच होता.  बीड तालुक्यातील केतुरा परिसरात इद्रुपा नदी तुडुंब वाहू लागली असून नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे.