शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

By admin | Updated: July 21, 2014 22:24 IST

निर्मल भारत अभियान : अनुदान वाटपासह शौचालय बांधकामातही आघाडी

वाशिम : निर्मल भारत अभियानच्या पायाभूत सर्वेक्षण ऑनलाईन करणार्‍यांमध्ये वाशिम जिल्हा सध्या महाराष्ट्रात अव्वल आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शौचालय अनुदानाचे वाटप आणि नविन शौचालय बांधकामालाही गती आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निर्मल भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांमध्ये सन २0१२-१३ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. सुरुवातीला आकड्यात केलेल्या या सर्वेक्षणाची माहिती आता ऑनलाईनद्वारे केंद्र शासनाला सादर करावयी आहे. शौचालय सुविधा असलेल्या व नसलेल्या राज्यातील १ कोटी २५ लाख कुटुंबाचा यामध्ये समावेश असून या सर्व कुटुंबाची सविस्तर माहिती ३१ जुलै २0१४ पर्यंत ऑन लाईन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हय़ातील पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत निर्मल भारत अभियान कक्षाच्यावतीने नियोजन करुन शासनाच्या निर्देशानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातील डाटा एन्ट्री ऑपरेटर व बीआरसी यांच्या मदतीने या कामाला गती दिली. एकूण २ लाख १७ हजार ८९७ उद्दिष्टापैकी सद्यस्थितीत (दि. १३ जुलै१४ पर्यंत) जिल्हय़ातील ७६ हजार ३११ कुटुंबांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. निर्मल भारत अभियानमधून मागील वर्षी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान वाटपात तसेच तालुक्यांमध्ये गती आली असुन सध्या जवळपास ७८ टक्के काम झाले आहे. यासाठी तालुकास्तरावरील बीआरसी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे चालू (सन २0१४-१४) वर्षातील टार्गेटनुसार मागील तीन महिन्यात शौचालय बांधकामाचे ३८ टक्के साध्य केले आहे.