शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

वारली चित्रशैली पोहोचली सातासमुद्रापलीकडे

By admin | Updated: May 28, 2014 00:01 IST

ग्रामीण भागातील वारली ही आदिवासी कला आज सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. कला जपण्यासाठी काही सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.

राहुल वाडेकर, तलवाडा  - ग्रामीण भागातील वारली ही आदिवासी कला आज सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. कला जपण्यासाठी काही सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परदेशात होणार्‍या प्रदर्शनातून वारली चित्रकलेच्या वस्तूंची विक्री केली जात असून ग्राहकांची त्याला चांगली मागणीही आहे़ चित्रशैलीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला तो डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील आदिवासी समाजाचे जीवा सोमा म्हसे यांच्यामुळे. जीवा यांना या कामगिरीसाठी आतापर्यंत ४३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांची दोन मुले जपानमध्ये वारली चित्रशैलीचे शिक्षण देत आहेत. वारली लोक आपली झोपडी बनविताना करवीच्या झाडांच्या फांद्यापासून कुड बनवितात, यावर शेण- मातीचे मिश्रण करुन कुड सारवतात. त्यावर सणासुदीला तसेच लग्नकार्याच्या वेळी मातीचा रंग तसेच पिठाचा वापर करुन भिंतीवर,ओट्यांवर, झोपडी असेल तर कुडावर,जोत्यावर व अंगणात वारली चित्र काढतात. या चित्रशैलीतून आदिवासी समाजाची संस्कृती, राहणीमान, जीवनमान, नृत्यकला (तारपा नृत्य,ढोल नृत्य) यांचे तसेच शेती,पशुपालन व समाजातील स्त्रियांचे दर्शन घडते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही चित्रशैली जपण्याचा प्रयत्न आता तरुण पिढीकडून होताना दिसत आहे. यामध्ये विक्रमगड तालुक्यातील वाकडुपाडा येथील सुनील खरपडे या युवकाने आदिवासी वारली कला केंद्राची या ठिकाणी स्थापना केली आहे. त्याच्या या कलेला रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही कला जपण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही सरसावले असून ही कला व्यवसायरुपातही उदयास येत आहे. कापड, पडदे, लाकडाच्या वस्तू, सौंदर्याची साधने,घराच्या भिंतीवर, गाडीवरही ही वारली पेंटिंग्ज काढल्या जात आहेत.