शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला वारकरी!

By admin | Updated: June 12, 2016 01:56 IST

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना

- राजेश भिसे, जालना

चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना मोफत बियाणे, नांगरणी आणि पेरणी करून देण्याची तयारी या वारकऱ्याने केली आहे. त्र्यंबकराव बोराडे असे या वारकऱ्याचे नाव. त्र्यंबकबापू यांचा जन्म मंठा तालुक्यातील बोराडे पाटोद्याचा. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकबापू यांनी पत्नीसह चारधाम केले होते. त्यानंतर, मावंदे (तीर्थस्थळी जाऊन आल्यानंतर करावयाचा धार्मिक विधी) करण्याचे त्यांनी ठरविले. या कार्यक्रमासाठी २ लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. आधीच दुष्काळ त्यात इतका पैसा खर्च करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत बनले. त्यांनी हा कार्यक्रम रद्द करून या पैशांतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार, आईच्या नावाने त्यांनी सरस्वती प्रतिष्ठान स्थापन केले. गतवर्षी मंठा आणि सेलू तालुक्यातील ५ एकरपर्यंत शेती असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबीयांची ३०९ एकर शेती नांगरणी आणि पेरणी करून दिली, तसेच मोफत खत आणि बियाणेही दिले. यंदाही मंठा तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील १४ अशी २५ शेतकऱ्यांची जवळपास १२६ एकर शेतजमीन यंदा त्र्यंबकबापू नांगरून देणार आहेत, तर आतापर्यंत मोफत खत व बियाणे घरपोच करण्यात आले आहे. त्र्यंबकबापू यांच्याकडे १ ट्रॅक्टर व इतर शेतीऔजारे असून, याच्या आधारे ते इतर शेतकऱ्यांची जमीन नांगरून देतात. निर्व्यसनी आणि मांसाहार न करणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्धार दोन वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार, गतवर्षी व यंदा तहसीलदारांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी घेतली आहे. या यादीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. - त्र्यंबकबापू बारोडे, प्रगतशील शेतकरी, सेलू