शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वारी येथील डोहामध्ये गेले आत्तापर्यंत १६८ बळी

By admin | Updated: August 16, 2016 19:20 IST

अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू

गोवर्धन गावंडे/ऑनलाइन लोकमतहिवरखेड, दि. 16 - अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली. गेल्या 20 वर्षांत आतापर्यंत १६८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.वारी येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरामध्ये २६ जानेवारी व १५ आॅगस्ट तसेच सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यातील पर्यटक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी असलेल्या या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. डोहामध्ये बुडणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी व युवकांचे प्रमाण जास्त असल्याने पोलीस स्टेशनच्या नोंदीवरून समजते. वारी हे गाव १९९० ते ९२ च्या दरम्यान वसल्यानंतर वारी येथे मंदिरासह वान धरण पाहण्यासाठी शालेय सहली येतात. १९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला असून यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बुडाले आहेत. मागील २ वर्षामध्ये शेगाव, जळगाव या ठिकाणाहुन आलेल्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे.

१८ ते २५ पर्यंत वयोगटातील युवक या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंत कळत नसल्याने बुडतात. या ठिकाणी सामाजिक संस्था, पोलीस विभाग, महसूल विभाग यांनी जर येणाऱ्या नागरिकांना डोहाच्या बाजुला सावधानतेचा इशारा देणारा फलक किंवा डोहाच्या आजुबाजूला तार कंपाउंड केले तर अनेकांचे जीव वाचू शकतील. पोलीस पाटील कासोटे यांनी सांगितले की, १९९२ पासून या वान नदीच्या डोहामध्ये आत्तापर्यंत १६८ लोकांना जलसमाधी मिळाली आहे.