शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखसाठी वानखेडे पुन्हा खुले !

By admin | Updated: August 3, 2015 02:16 IST

बॉलीवूड अभिनेता व आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याला आता वानखेडे स्टेडियम पुन्हा खुले झाले आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता व आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याला आता वानखेडे स्टेडियम पुन्हा खुले झाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अखत्यारीतील या स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरूखला पाच वर्षांसाठी मनाई केली होती. मात्र एमसीएने दोन वर्षे आधीच ही बंदी मागे घेतली आहे.वानखेडेवरील सुरक्षारक्षकासोबत वाद घातल्याप्रकरणी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एमसीएच्या समितीने १८ मे २०१२ रोजी शाहरूखवर वानखेडे स्टेडियम व परिसरामध्ये प्रवेश करण्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. रविवारी झालेल्या एमसीएच्या बैठकीमध्ये ही बंदी उठविण्यात आली. या निर्णयाविषयी एमसीए उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्वकल्पना दिल्यानंतर मी समितीसमोर शाहरूखवरील बंदी हटविण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यास सर्वांनी एकमताने होकार दिला. यामुळे आता शाहरुखला वानखेडे स्टेडियम तसेच परिसरात प्रवेश बंदी नसेल.शाहरुखने आतापर्यंत या बंदीविरोधात कोणतेही आक्षेपार्ह हालचाल केली नसून त्याने एमसीएच्या निर्णयाचे पालन केले आणि कधीही स्टेडियममध्ये किंवा परिसरात प्रवेश केला नाही. यामुळेच त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे एमसीएने स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)नेमके काय झालेल?वानखेडे स्टेडियमवर १६ मे २०१२ रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी शाहरुख आपल्या मुलांसह मैदानात उतरला. यावेळी सुरक्षारक्षक विकास बाळकृष्ण दळवी यांनी मैदानात येण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे चवताळलेल्या शाहरुखने दळवी यांच्यासोबत वाद घालून अक्षरश: धिंगाणा घातला. यावेळी त्याने उपस्थित तेथील अधिकाऱ्यांशी देखील गैरवर्तन केल्याने एमसीएने त्याच्यावर ही बंदी घातली होती.............