शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मपोसे अधिकाऱ्यांची प्रतीक्षा टळणार

By admin | Updated: July 21, 2015 02:02 IST

सेवाज्येष्ठतेबरोबरच आवश्यक सर्व निकषांची पूर्तता असूनही भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी बनण्यासाठी दीड, दोन दशके प्रतीक्षा करावी लागणाऱ्या राज्य

जमीर काझी , मुंबई सेवाज्येष्ठतेबरोबरच आवश्यक सर्व निकषांची पूर्तता असूनही भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी बनण्यासाठी दीड, दोन दशके प्रतीक्षा करावी लागणाऱ्या राज्य सेवेतील उपायुक्त, अपर अधीक्षकांसाठी एक खूशखबर आहे. त्यांना ‘केडर’ पदोन्नती मिळण्यात अडसर असणाऱ्या गोपनीय अहवालाच्या (सीआर) भाषेतील अडसर दूर करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यापुढे १० वर्षांहून अधिक सेवा झालेल्यांचे सीआर मराठीबरोबर इंग्रजीतही नोंदविले जाणार आहेत. त्यामुळे केंद्रीय गृह विभागाकडे प्रलंबित राहणारे प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात आयपीएस दर्जाची ३०२ पदे कार्यरत असून, त्यापैकी २५ टक्के म्हणजे साधारण ७५ अधिकारी हे राज्य सेवेतून घ्यावेत, असा संकेत आहे. मात्र बढतीअभावी त्यांची अपवादात्मकरीत्या अंमलबजावणी केली जाते. नव्या निर्णयामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रीयन अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे भरती झालेल्या पोलीस उपाधीक्षक/साहाय्यक आयुक्त यांची किमान ८ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर ते पदोन्नतीने भारतीय पोलीस सेवेत समावेश होण्याच्या प्राथमिक निकषाला पात्र ठरत असतात. अशा अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता, त्यांचे सीआर, विशेष कामगिरीबाबतचा तपशील बनवून पोलीस महासंचालकाकडून राज्याच्या गृह सचिवाकडे पाठविला जातो. त्यांच्याकडून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दरवर्षी पाठवायचा असतो. मात्र काही आयपीएस अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता इतरांचा मपोसे अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो़ त्यामुळे त्यांच्याकडून प्रस्ताव बनविण्यामध्ये जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो, अशी खात्यांतर्गत चर्चा असते. त्यातही राज्य सेवेतील अधिकाऱ्यांचे सीआर हे प्रामुख्याने मराठीत लिहिले जातात. मात्र आयपीएसच्या संवर्गासाठी पाठवावयाच्या यादीतील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल इंग्रजीत पाठवावे लागत असल्याने त्यांचे साधारण गेल्या ६-७ वर्षांचे वार्षिक सीआर पुन्हा इंग्रजीमध्ये भाषांतर करून पाठवावे लागतात. या कामासाठी विलंब लागत असल्याने आधीच विलंब झालेली पदोन्नती आणखी काही काळ लांबत राहात असल्याने राज्य सेवेतील अधिकाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याची दखल घेत १० वर्षे सेवा झालेल्या एसीपी/डीवायएसपीचे सीआर हे इंग्रजीत लिहिण्याची सूचना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.