शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमातील वृद्धांना कुलदीपकांची प्रतीक्षा

By admin | Updated: October 28, 2016 00:22 IST

आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले,

दिवाळीला घरी नेणार का ? : काळजाच्या तुकड्यांकडून हवाय वेळमोहन राऊत  धामणगाव रेल्वेआयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवीत नाहीत़ दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील का, अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे़ दिवाळीच्या उत्सवाला बुधवारी वसुबारसपासून सुरूवात झाली़ यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात़ जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर मोजके वृध्दाश्रम सुरळीतपणे सुरू आहे़ समाजाचे ऋण फेडावे स्वखर्चाने आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहे़ दीपावलीच्या पार्श्वभूमिवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले, याची बेरीज,वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही, हेच आजची पिढी विसरली आहे़ या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र आजची पिढी खोटी प्रतिष्ठा वंशाचे दिवे जपत आहे़घराची लागलीय आसतळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृद्ध आई-वडिलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे़ याचे काहीच वाटत नसेल काय दिवाळीसारख्या सणाला आपल्याला घराकडे न्यावे, अशी प्रतिक्रिया वृद्धांनी व्यक्त केली़जुन्या आठवणींना उजाळाएका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाचा दिव्याची कथा विशद केली़ लहान पणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटा पिटा केला आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास दरवर्षी टाळले जाते़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करताना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृद्धापकाळात आमच्या सारख्या आई-वडिलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़कुलदीपक कधी देणार वेळ ?वंशाच्या दिव्याला जन्म देताना आईला मोठ्या कळा सोसाव्या लागल्यात. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांची असते. परंतु लग्न झाल्याबरोबर या कुलदीपकांनी आपल्याला आश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनीट आपल्याला भेटायला येते, अशी माहिती आता नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी दु:खाचे आश्रू पुसत जीवन जगावे लागत असल्याची कैफियत एका वृद्ध महिलेने मांडली़