शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक केंद्राची प्रतीक्षाच!

By admin | Updated: October 17, 2016 01:32 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या भोसरी औद्योगिक परिसरातील प्रस्तावित अग्निशामक केंद्राचा प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित आहे.

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या भोसरी औद्योगिक परिसरातील प्रस्तावित अग्निशामक केंद्राचा प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. दोन महिन्यांपूर्वी भोसरी एमआयडीसी फेज २ येथे २९.९९ टक्क्यांनी कमी दराने ४६ लाख ६८ हजार ५३१ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. पण अजूनही बांधकाम सुरू झाले नसल्याने स्थापत्य विभागाच्या धीम्या कारभारामुळे एमआयडीसी भागातील उद्योगांच्या व रहिवाशांच्या अग्निसुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमआयडीसी महापालिकेकडे १९८२मध्ये हस्तांतरित करण्यात आली. ३४ वर्षे लोटली, पण एमआयडीसीला मूलभूत सुविधा देण्यास अजूनही पालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. एमआयडीसी परिसरात मतदार नाही, असा समज असल्याने राजकीय पुढाऱ्यांचेही येथील प्रश्नांकडे दुर्लक्षच असते. त्यामुळे ढिम्म पालिका प्रशासन व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अशी सावत्र वागणूक एमआयडीसीच्या नशिबी आली आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर असून, शहराची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे, तर शहरात सुमारे १५ हजार उद्योगधंदे आहेत. भोसरी, कुदळवाडी, चिंंचवडसह शहराच्या विविध भागांत छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकेची अग्निशामक यंत्रणाही तितकीच सक्षम असणे गरजेचे आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात फक्त संत तुकारामनगर व भोसरी गावठाण येथील अग्निशामक केंद्र ही दोनच केंद्रे असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स अशा खासगी कंपन्यांचे बंब मागवावे लागतात. त्यात बराच उशीर होतो व छोटी आगीची घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होते. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या माहितीप्रमाणे २२ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी -चिंचवड शहरातून आगीच्या घटनांबाबत ९०० वर्दी येतात. त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेकडे फक्त १३ अग्निशामक बंब व १४० अग्निशामक जवान आहेत. त्यातील काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आणखी किमान १५० कर्मचाऱ्यांची व १० अग्निशामक वाहनांची गरज आहे. या आकडेवारीवरून जागतिक दर्जा असलेल्या उद्योगनगरीची अग्निशामक यंत्रणा किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होते. भोसरीतील वाढते औद्योगिकीकरण व वाढती लोकसंख्या पाहता भोसरी परिसरात आणखी २ अग्निशामक केंद्रांची गरज आहे. >शहरात अग्निशामक दलाची पाच केंदे्र आहेत. चिखली व भोसरी एमआयडीसीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून मागणी आहे. मात्र, स्थापत्य विभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने अग्निशामक दलांच्या केंद्र उभारणीला विलंब होत आहे. संपूर्ण शहराची अग्निसुरक्षा सध्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड ठरत आहे. शहरातील वाढत्या आगींच्या प्रकरणामुळे महापालिकेनेही या गोष्टींचा विचार करायला हवा - किरण गावडे, वरिष्ठ अग्निशामक अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका