शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 8, 2014 21:54 IST

पाऊस लांबल्याने सिंचनासाठी उपसा करणे एकमेव पर्याय

बुलढाणा: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पिकांची भिस्त इतर जलस्रोतांवर आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी कृषिपंप हा एकमेव पर्याय असताना, राज्यभरातील २ लाख ७३ हजार कृषिपंप विद्युत जोडण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास शेतीच्या माध्यमातून मदत व्हावी, पिकांना पाणीपुरवठय़ासाठी पर्याय मिळावा, म्हणून शेतकर्‍यांसाठी कृषिपंपांच्या विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. शासनाकडून कृषिपंप मिळालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी म्हणून वीज कंपनीकडे पैशाचा भरणा केला; मात्र महावितरणकडे अर्ज करूनही, अशा लाखो शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांचा आकडा मोठा आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या अकरा जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून २0१३ साली २५ हजार ७७९ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली; मात्र, आवश्यक रक्कम भरूनही ५४ हजार ६४३ कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगितले की, कृषी विभागाचा अहवाल आणि प्राप्त आदेशानुसार वीज कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे; मात्र, नवीन वीज जोडणी देण्याशी याचा काहीही संबंध नाही.