शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

सुगरणीला प्रतीक्षा पावसाची

By admin | Updated: June 1, 2015 02:52 IST

पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ

यादव तरटे पाटील, (लेखक अमरावती येथील पक्षीतज्ज्ञ आहेत) -पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस म्हणजे मातीचा सुगंध. सूर्यनारायणाच्या कहराने अख्खी वसुंधरा तप्त होत असताना अचानक मान्सूनची चाहूल लागताच झाडे-झुडुपे यांच्यासकट प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना एक वेगळीच खुमारी येते. अख्खे पक्षीजीवन स्वागतासाठी सज्ज होते. सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ हाच आहे. उन्हाळा संपायला सुरुवात होणार आणि मग मान्सूनच पाऊस येणार याच इराद्याने सालाबादप्रमाणे हे सगळे पक्षी आपल्या जोडीदारासोबत तर कधी एकटेच घरटी बनविताना दिसतात. बुलबुल, कस्तूर, कांचन, निळ्या शेपटीचा वेडा राघू तर जीवाचा आकांत करून पोट भरून नुसते खाताना दिसतात. नवीन पिढी घडविण्यासाठी मादी व नराला भरपूर ऊर्जा लागते. तसेच अंडी दिल्यानंतर पिल्लांना पण भरपूर खाद्य भरवावे लागते. ऊन जास्त असल्यामुळे पिल्लांना तापमान सहन होत नाही. किंवा काही पक्ष्यांची अंडी पण सध्याच्या जास्त उन्हात तग धरू शकत नाही. मान्सून आणि पक्ष्यांचा पाळणा यात खूप घट्ट नाते आहे. ‘पल्लवपुच्छ कोतवाल’ हा पक्षी सध्या मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे याचे घरटे असते. आता पाऊस येईल आणि लहान पिल्ले त्यातून निघेल याचा जणू संकेतच ते देत असावेत. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचे देखील आपल्या भागात आगमन झाले असून, हा पक्षी नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये घरटी करण्यासाठी सध्या जागा शोधण्यात मग्न आहे. जून, जुलैमध्ये कपाच्या आकाराचे घरटे तयार करून हा पक्षी त्यात अंडी देतो. पाऊस आला की फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजीवांची संख्या वाढणार आणि मग पोटभर खायला मिळणार हाच अंदाज बांधून घरट्यांचा सगळा खटाटोप चाललेला असतो. कावळा, चातक हे पक्षी याबाबतीत आपल्या संस्कृतीत प्रसिद्ध झाले आहेत. कावळ्याने आपले घरटे किती उंचावर बांधले यावरून पाऊस किती येईल याचा अंदाज आमचा बळीराजा घेत असतो. चातक पक्ष्याची वाट अनेक शेतकरी मोठ्या आशेने पाहतात. चातक पक्ष्याचे आगमन होणे म्हणजे पाऊस येणे हे अगदी पक्के आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. पावशा या पक्षाचा तर आवाजच ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ किंवा ‘पाऊस आला’ असाच येतो. चला तर मग चातकाच्या येण्याची आणि पावशाने ‘पेरते व्हा’ म्हणण्याची वाट पाहू या !