शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतिक्षा कृत्रिम हातांची...

By admin | Updated: May 14, 2014 23:35 IST

केईएम रुग्णालयात पार पडली अखेरची पूर्वचाचणी,घाटकोपर स्थानकात झालेल्या रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या कृत्रिम हातांची अखेरची पूर्वचाचणी पार पडली आहे.

मुंबई : घाटकोपर स्थानकात झालेल्या रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या कृत्रिम हातांची अखेरची पूर्वचाचणी पार पडली आहे. यानंतर जर्मनीवरुन हात येणार असून २१ मेला मोनिकावर शस्त्रक्रिया करुन कृत्रिम हात बसविण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला हालचाल करणे शक्य होणार असून त्यासाठी नव्या उत्साहाने मोनिका सरावाला लागली आहे.केईएम रुग्णालयात पार पडलेल्या पूर्वचाचणी दरम्यान मोनिकाच्या चेहर्‍यावर आशेची लकेर उमटली. तब्बल तीन महिने जगण्याचा आत्मविश्वासच हरपलेल्या मोनिकाच्या चेहर्‍यावर या चाचणीदरम्यान जणू पुनर्जन्म मिळाल्याची भावना होती. यावेळी कित्येक दिवसांनी मोनिकाच्या चेहर्‍यावर तिच्या कुटुंबियांनी हसू पाहिले. या चाचणीत कृत्रिम हातांच्या हालचाली, बोटांची हालचाल सामान्यपणे होण्यासाठी सराव सुरु आहे; या सरावाला ती सकारात्मक प्रतिसादही देत आहे. अंतिम शस्त्रक्रिया पार पडेपर्यंत तिचा सराव सुरु राहिल. याशिवाय, या कृत्रिम हातांचा रंगही मोनिकांच्या हातांसारखाच असेल, अशी माहिती मोनिकाचे वडील अशोक मोरे यांनी दिली.घाटकोपर स्थानकात ११ जानेवारी रोजी मोनिका मोरे हिचा फलाट आणि लोकलच्या पोकळीत अडकल्याने अपघात झाला होता. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला शिकणार्‍या मोनिकाने या अपघातात दोन्हीही हात खांद्यापासून गमावले. त्यानंतर तिला उपचारासाठी राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु यंत्रणेच्या अभावामुळे केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र मोनिकाच्या जीवनाला नवसंजीवनी देणार्‍या कृत्रिम हातांसाठी मोरे कुटुंबियांना देश-विदेशातून मदत मिळाली. याच मदतीच्या माध्यमातून लवकरच तिची कृत्रिम हातांची शस्त्रक्रिया पार पडेल. (प्रतिनिधी)