शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 01:21 IST

राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत.

विवेक चांदूरकर - अकोलाराज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. आता शासनाकडे निधी नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्या वतीने पिटण्यात येतो, तर दुसरीकडे विहिरीत पाणी असल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व त्यांना फायदा होईल; मात्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. अशा १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण आपल्या कामाची वाहवा करीत आहे. २००५ मध्ये राज्यात नऊ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. दरम्यान, धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतामधील विहिरींची पाण्याची पातळी वाढते व शेतकरी त्या पाण्यातून सिंचन करू शकतात.