शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

२0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा

By admin | Updated: October 20, 2016 06:01 IST

दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करत, आंदोलनाची भूमिका दिवावासीयांकडून घेण्यात आली.

मुंबई : दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करत, आंदोलनाची भूमिका दिवावासीयांकडून घेण्यात आली. ही मागणी लक्षात घेता, जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेकडून गेल्या काही दिवसांपासून ब्लॉक घेऊन काम केले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी शेवटचा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यानंतर काही दिवसांतच जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येईल. जवळपास २0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना थांबा देण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रद्द होत असलेल्या लोकल आणि जलद मार्गाने जाणाऱ्या लोकल पाहता, यामुळे दिवा स्थानकातील धिम्या मार्गावर प्रवाशांनी जानेवारी २0१५ मध्ये उग्र आंदोलन करत, बरीच तोडफोड केली. यामध्ये स्थानकाचे प्रचंड नुकसान झाले. या आंदोलनानंतर दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याची मागणीला जोर धरू लागला आणि एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन), तसेच मध्य रेल्वेने दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आणि नवीन मार्ग टाकण्यासाठी नियोजन केले. हे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्या काही दिवसांत रविवारी नऊ ते दहा तासांचा ब्लॉक घेऊन दिवा स्थानकात कट-कनेक्शनचे काम केले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी शेवटचा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यानंतर जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येईल, अशी माहिती समोर आली. २0 पेक्षा जास्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या काही लोकलमध्ये दिवा स्थानकात थांबा देण्यात येत असल्याच्या उद्घोषणेचे काम बहुतांश लोकलमध्ये होताच, थांबा देण्यास सुरुवात केली जाईल. (प्रतिनिधी)>थांबा देण्यास सुरुवातअप आणि डाउन मार्गावरून जाताना, प्रत्येकी १0 किंवा १२ जलद लोकल फेऱ्या दिवा स्थानकात थांबविल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. दिवा स्थानकात थांबा देण्यात येत असल्याच्या उद्घोषणेचे काम होताच, थांबा देण्यास सुरुवात केली जाईल.