शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाई हत्याकांड - अंजिराच्या झाडाखालून काढला वनिताच्या हाडांचा सापळा

By admin | Updated: August 19, 2016 16:49 IST

वाई हत्याकांडप्रकरणी वनिता गायकवाडचा खून करून कृष्णा नदीपात्रात टाकल्याचे सांगणा-या संतोष पोळने गुरुवारी घुमजाव करत वनिताचा मृतदेह धोम धरण परिसरात गाडल्याचे सांगितले होते

वाई हत्याकांडातील सहाव्या खुनाचे पुरावे पोलिसांच्या हातीआॅनलाईन लोकमतसातारा, दि. १९ : वाई हत्याकांडप्रकरणी वनिता गायकवाडचा खून करून कृष्णा नदीपात्रात टाकल्याचे सांगणा-या संतोष पोळने गुरुवारी घुमजाव करत वनिताचा मृतदेह धोम धरण परिसरात गाडल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिस शुक्रवारी दुपारी साडेबाराला संतोष पोळसह फौजफाटा घेऊन धोम येथील घराजवळ पोहोचला. घरासमोरच असलेल्या अंजिराच्या झाडाखाली तब्बल 7 फूट खोदकाम करून सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर हाडांचा सापळा काढण्यात पोलिसांना यश आले. आता एकूण सहा जणांचे सापळे हाती आले आहेत.

धोम येथे राहणा-या वनिता गायकवाड उपचारासाठी संतोष पोळकडे जात असत. २००६ मध्ये त्याही अचानक गायब झाल्या होत्या. पोळ याला अटक केल्यानंतर वनिताचा खून करून मृतदेह धोम येथील घराजवळ गाडल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले. या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी जेसीबी अन वायरमन यांच्यासह पन्नासहून अधिक पोलिस फौजफाटा घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, वाईचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट शुक्रवारी दुपारी साडेबाराला संतोष पोळला घेऊन संबंधित घराजवळ पोहोचले.

( आणखी वाचावाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट' )

एरव्ही दंडुका घेऊन फिरणा-या पोलिसांच्या हातात कु-हाड, करवती दिसत होत्या. संतोष पोळ याने खून केल्यानंतर ज्या ठिकाणी मृतदेह गाडला होता, तिथे अंजिराचे झाड लावले होते. ते झाड संतोषने पोसिलांना दाखविले. हे झाड दहा वर्षांत 20 फूट मोठे झाले आहे. अखेर हे झाड तोडून जमिनीखाली सुमारे तीन तास उत्खनन केल्यानंतर हाडांचा सापळा आढळून आला.