शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वेतनसुधारणा समितीची टुरटुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 04:05 IST

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात करण्यात आली. मात्र, ही स्थापना केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सहा महिन्यांत समितीकडून देशभर दौरे करण्यात आले. यातील प्रत्येक दौऱ्यांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आला, परंतु अद्याप शिफारसी अहवाल मात्र सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनांकडून नाराजीचा सूर लावण्यात आला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीच रचनात्मक व्यवस्था नसून, दर चार वर्षांनी विशिष्ट पद्धतीने कामगारांना वेतनवाढ दिली जाते. कामाचे स्वरूप आणि मिळणारे वेतन याचा संबंध जुळवून वेतननिश्चिती झाली पाहिजे. याच उद्देशाने वेतन अभ्यास गटाची निर्मिती जुलै २0१६ रोजी करण्यात आली. या वेतन अभ्यासगटाचे अध्यक्ष डी.आर.परिहार आणि अन्य अधिकारी असून, जुलै महिन्यात या समितीची दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. त्यात समितीला वेतनवाढीसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना करतानाच, चार महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती दिली, परंतु अहवाल सादर न झाल्याने समितीने फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी समितीकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या अभ्यासासाठी देशभर दौरे करून माहिती घेण्याचा अजब प्रकार केला आहे. बेंगलोर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, चैन्नई, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश यासह अन्य राज्यांत दौरे केले आहेत. यातील प्रत्येक दौऱ्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, एसटीचे स्टेनो टायपिस्ट मदतीला न घेता, बाहेरून स्टेनो टायपिस्ट घेऊन त्याचा सुमारे ६0 हजार रुपये भत्ताही मिळवला आहे. गेल्या सहा महिन्यांत असा खर्च केल्यानंतरही अहवालाबाबत समितीकडून चिडीचूप राहाणेच पसंत केले आहे. त्यामुळे एवढे दौरे केल्यानंतर तरी कामगारांचा पगार वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)