शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वाघदरी घाटातील दरड तीन महिने पडून!

By admin | Updated: November 4, 2016 02:59 IST

रस्त्यावर मोठं-मोठाले पडलेले दगड उचलण्यात अथवा ते दूर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही फुरसत मिळालेली नाही

हुसेन मेमन,

जव्हार- जव्हार चालातवडहून वावर वांगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाघदरी घाटात जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठं-मोठाले पडलेले दगड उचलण्यात अथवा ते दूर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही फुरसत मिळालेली नाही त्यामुळे या घाटातील प्रवास जीवघेणा ठरतो आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सां.बा. ला जाग येईल काय? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शेजारच्या ठाणे जिल्ह्यातले असून त्यांना याबाबत आदेश द्यावेसे कधी वाटणार? असाही प्रश्न चर्चिला जात आहे.जव्हार चालातवडहून वावर वांगणीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. वावर वांगणी, जांभुळमाथा, सारसून आदी महसूली ७ गावे व १५ पाडे असे मिळून ५ हजारापेक्षा अधिक लोकवस्ती या भागात राहत आहेत. तसेच हा रस्ता नाशिक जिल्ह्याला ओझरखेड येथे मिळतो. त्यामुळे या रस्त्यावरून सतत सर्व वाहनांची मोठी वर्दळ असते. दरड दूर करण्याबाबत सा. बां. च्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वावर येथे उपप्राथमिक आरोग्यकेंद्र आहे. तर त्याचे मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र चालतवड हे आहे. त्यामुळे वावर येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्रातून रोज रात्री- बेरात्री रु ग्णांना व गरोदर महिलांना घेवून चालतवड येथे यावे लागते. मात्र दरड कोसळल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. >मंत्री एकनाथ शिंदे कधी लक्ष घालणार?पाऊस पडल्यावर या वाघदरी घाटातून वाहने चालविणे कठीण होवून अनेक वाहन चालकांवर आपली वाहने परत फिरवून माघारी जाण्याची वेळही आली आहे. वाघदरी घाटात ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्या ठिकाणी खाली ५ हजार फुटांपेक्षा अधिक खोल दरी आहे. त्यामुळे वाहन चालकांना काळजीपूर्वक वाहन चालवावे लागत आहे. आता पावसाळा संपला परतीचा पाऊसही संपला त्यामुळे हे महाकाय दगड व मातीचे ढिगारे आता तरी हटवावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.