शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहिन्या बनल्या धोकादायक

By admin | Updated: October 20, 2016 03:04 IST

तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली

नवी मुंबई : तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली आहे. केबल इतस्थत: पडल्या असून त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत असून महावितरण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रभाग ७१ चे शिवसेना शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी याविषयी महावितरण पदाधिकाऱ्यांना पत्र देवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या परिसरामध्ये अरूंद गल्लींमध्ये विद्युत मीटर केबिन बसविल्या आहेत. पाच ते सहा वर्षापूर्वीच येथे नवीन केबिन बसविल्या होत्या. पण निकृष्टपणे काम केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. विजेच्या केबल इतस्थत: पडल्या आहेत. या केबलला धक्का लागून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केबिनला लहान मुलांचा किंवा नागरिकांचा हात लागला तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय झोपडपट्टीला आग लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेवून ठोस उपाययोजना करावी. वेळेत दुरूस्तीचे काम सुरू केले नाही व एखादा अपघात घडला तर त्याला पूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील. मागणीनंतरही कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा तय्यब पटेल यांनी दिला आहे.