शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मतदारांचा कौल आज कळणार

By admin | Updated: October 18, 2014 22:50 IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेला बसलेल्या (ख:या अर्थाने उभे राहिलेल्या) सर्व परीक्षार्थीचा म्हणजेच उमेदवारांचा आज ‘रिझल्ट’ लागणार आहे.

पुणो : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेला बसलेल्या (ख:या अर्थाने उभे राहिलेल्या) सर्व परीक्षार्थीचा म्हणजेच उमेदवारांचा आज ‘रिझल्ट’ लागणार आहे. 
अवघ्या चार दिवसांपूर्वी झालेली परीक्षा, उमेदवारांना तयारीसाठी मिळालेला अल्प वेळ आणि युती व आघाडी तुटल्याने परीक्षेचा कठीण गेलेला पेपर. आता काय होणार? पास की नापास? याचा फैसला आज होत आहे. 
जिल्ह्यातून या निवडणुकीच्या परीक्षेला 3क्8 उमेदवार होते; परंतु जागा आहेत फक्त 21. शहरातील 11 आणि जिल्ह्यातील 1क्. या परीक्षेच्या तयारीसाठी यंदा उमेदवारांना फारसा वेळ मिळाला नाही. त्यातच शासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानाने मतदानाचाही टक्का वाढला. यामुळे अनेक मातब्बर उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. 
मी-मी म्हणणारे दिग्गज पराभवाच्या धास्तीने घाबरले आहेत, तर नवख्या उमेदवारांना पंचरंगीमुळे विजयाची संधी वाटत आहे. काय होईल? कोण मारेल बाजी? याचा फैसला उद्या दुपारी 12 र्पयत स्पष्ट होईल. निकाल तयार आहे. आज फक्त जाहीर होणार आहे एवढेच!
अतिशय कमी वेळेत व कमी तयारीत, मात्र मुबलक खर्चात लढवली गेलेली ही अलीकडच्या काळातील पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
 एक्ङिाट पोलचा निकाल खोटा ठरविण्याची ताकत मतदारांत आहे. एका अर्थाने ‘एक्ङिाट पोल’ची उद्या परीक्षा आहे. पंचरंगी लढतीत कोणाच्या गळ्यात विजयमाला पडते, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
 
4जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूर, बारामती, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. प्रत्येक मतदारसंघासठी 21 टेबल असतील, 1 टेबल टपाली मतदानासाठी असेल. खडकवासला मतदारसंघाची  मतमोजणी बालेवाडीच्या क्रीडासंकुलात होईल. सकाळी 11 र्पयत पहिला निकाल लागणो अपेक्षित आहे. 
4जिल्ह्यात यंदा प्रथमच विक्रमी मतदान झाले आहे. मात्र, पंचरंगी लढतीमुळे विजयाचा कौल हा निसटता असण्याचीच जास्त शक्यता आहे. यंदा प्रथमच चुरशीची पंचरंगी लढत होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात जमाव बंदी जाहीर केली असून, उमेदवारांना विजयी मिरवणुका काढण्यास रविवारी बंदी घातली आहे. मतमोजणी केंद्राच्या आवारात हत्यारे, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
21 भाग्यवंत कोण?
या निवडणुकीतील 3क्8 उमेदवारांपैकी 21 भाग्यवंत कोण असतील? कोण विधानसभेची पायरी पहिल्यांदा चढेल आणि कोण पुन्हा आमदार होईल? याचा निकाल आता अवघ्या काही  तासांवर आहे. कधी नव्हे ती यंदा निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 
सार्कचे शिष्टमंडळ पुण्यात 
साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशनच्या (सार्क) 17 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ निवडणुक प्रक्रियेची माहिती करुन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौ:यावर येत आहेत. प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया, व्यवस्थापन, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावे यासाठी करण्यात येणा:या उपाययोजना व एकूणच संपुर्ण निवडणुक प्रक्रियेची माहिती करुन घेण्यासाठी शिष्टमंडळ येत आहे. सार्कमध्ये भारतासह बांगलादेश, भुतान, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे. 
 
दहा हजार टपाली मतदानाची शक्यता 
निवडणूक कार्यासाठी जाणा:या कर्मचा:यांना टपाली मतदान करता येते. सायंकाळपयर्ंत सहा हजार टपाल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. रविवारी सकाळी आठवाजेपयर्ंत प्राप्त होणारे टपाली मतदान पत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. सुमारे दहा हजार टपाली मतपत्रिका प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे.  टपाली मतदानाची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.  
 
4पुणो : आघाडी व युतीतील मोडलेल्या संसारामुळे झालेल्या पंचरंगी लढती, मतदानाचा वाढलेला टक्का या पाश्र्वभूमीवर मतदारराजाने कौल कोणाच्या बाजुने दिला, हे आज स्पष्ट होणार आहे.  जिल्ह्यातील 21 मतदारसंघात 3क्8 उमेदवार रिंगणात असून, त्यातील मतदारांच्या दृष्टीने सवरेत्तम ठरलेल्या एकवीस जणांना विधानसभेत जाण्याची संधी मिळणार आहे.वाढलेला टक्का प्रस्थापितां विरोधात जाणार की, धक्का देऊन अन्य चेहरा पुढे येणार या चर्चेला विराम मिळणार आहे. 
 
शहरातील 11 आणि जिल्ह्यातील 1क्. या परीक्षेच्या तयारीसाठी यंदा उमेदवारांना फारसा वेळ मिळाला नाही. त्यातच शासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानाने मतदानाचाही टक्का वाढला. यामुळे अनेक मातब्बर उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. मी-मी म्हणणारे दिग्गज पराभवाच्या धास्तीने घाबरले आहेत, तर नवख्या उमेदवारांना पंचरंगीमुळे विजयाची संधी वाटत आहे. काय होईल? कोण मारेल बाजी? याचा फैसला रविवारी 
दुपारी 12 र्पयत स्पष्ट होईल. 
 
निकालासाठी प्रशासन सज्ज 
1जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूर, बारामती, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. प्रत्येक मतदारसंघासठी 21 टेबल असतील, 1 टेबल टपाली मतदानासाठी असेल. 
2खडकवासला मतदारसंघाची  मतमोजणी बालेवाडीच्या क्रीडासंकुलात होईल. सकाळी 11 र्पयत पहिला निकाल लागणो अपेक्षित आहे. जिल्ह्यात यंदा प्रथमच विक्रमी मतदान झाले आहे. मात्र, पंचरंगी लढतीमुळे विजयाचा कौल हा निसटता असण्याचीच जास्त शक्यता आहे. 
3यंदा प्रथमच चुरशीची पंचरंगी लढत होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 
4पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात जमाव बंदी जाहीर केली असून, उमेदवारांना विजयी मिरवणुका काढण्यास रविवारी बंदी घातली आहे. मतमोजणी केंद्राच्या आवारात हत्यारे, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
4जुन्नर : शरद सोनवणो (मनसे) 7 आशा बुचके (शिवसेना) 7 अतुल बेनके (राष्ट्रवादी) गणपत फुलवडे (काँग्रेस)  
7 नेताजी डोके (भाजप)   
4आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी)  7 अरुण गिरे (शिवसेना)  7 जयसिंग एरंडे (भाजप) 7 संध्या बाणखेले (काँग्रेस)
4शिरूर : अशोक पवार (राष्ट्रवादी) 7 बाबूराव पाचण्रे (भाजप) 7 कमलाकर सातव (काँग्रेस) 7 संजय सातव (शिवसेना).
4खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी) 7 सुरेश गोरे (शिवसेना) 7 शरद बुट्टेपाटील (भाजप) 7 वंदना सातपुते (काँग्रेस)
4दौंड : रमेश थोरात (राष्ट्रवादी)  7 राहुल कुल (रासप) 7 पोपपटराव ताकवणो (काँग्रेस) 7 विकास ताकवणो (अपक्ष)
4बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी)  7 बाळासाहेब गावडे (भाजप) 7 आकाश मोरे (काँग्रेस) 7 राजेंद्र काळे (शिवसेना)
4इंदापूर : हर्षवर्धन पाटील (काँग्रेस) 7 दत्ता भरणो (राष्ट्रवादी) 7 विशाल बोंद्रे (शिवसेना) 7 माऊली चौरे (भाजपा)
4पुरंदर : संजय जगताप (काँग्रेस)  7 अशोक टेकवडे (राष्ट्रवादी) 7 विजय शिवतारे (शिवसेना) 7 संगिता राजे निंबाळकर (भाजप)
4भोर : संग्राम थोपटे (काँग्रेस)  7 विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)  7 कुलदीप कोंडे (शिवसेना) 7 शरद ढमाले (भाजप)
4मावळ : बाळा भेगडे (भाजप) 7 माऊली दाभाडे (राष्ट्रवादी) 7 किरण गायकवाड (काँग्रेस) 7 मच्छिंद्र खराडे (शिवसेना)