शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

नवीन उमेदवारांना मतदारांची पसंती

By admin | Updated: February 27, 2017 00:15 IST

महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १७ च्या लढतीमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले

रावेत : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १७ च्या लढतीमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले. नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, करूणा चिंचवडे, सचिन चिंचवडे या नवीन चेहऱ्यांना संधी दिली. नवीन उमेदवारांना मतदारांना या प्रभागातून पसंती दिली. पाच वेळा निवडून आलेले भाऊसाहेब भोईर पराभूत झाले. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगरी, दळवीनगर या अत्यंत चुरशीच्या समजल्या गेलेल्या आणि पूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग १७ मधे राष्ट्रवादीचे मात्तबर विरूद्ध नवीन चेहरे असा सामना होता. मोदीलाटेचा प्रभाव या प्रभाग जाणविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या दिग्गज उमेदवार विद्यमान नगरसेविका आशा सूर्यवंशी यांचा भाजपाच्या उमेदवार करुणा चिंचवडे यांनी दारुण पराभव केला. मागील निवडणुकीत विजयाने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या माधुरी कुलकर्णीला मात्र मतदारांनी या वेळी विजयाची माळ घातली. तसेच मागील निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले नामदेव ढाके या निवडणुकीत मात्र मताधिक्याने निवडून आले. त्यांनी माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र साळुंखे यांचा पराभव केला. या निकालावर बिजलीनगर, वाल्हेकरवाडीचे भविष्य ठरणार होते. नवीन चेहरा करुणा चिंचवडे यांनीही आघाडी घेतली. स्थलांतरित वर्ग व तरुण वर्ग यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फायदा झाला. राष्ट्रवादीचे तगडे पॅनल असूनही त्याला भारतीय जनता पार्टीने तोड दिली. या प्रभागासाठी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी जोरदार ताकद लावली होती. नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांचा विश्वास संपादन करण्यात भाजपाला यश आले, असे जरी असले तरी मतदान यंत्रात फेरफार केल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीने केल्या आहेत. वास्तविक कोणत्याही दिग्गज नेत्याची प्रचार सभा झाली नसताना मतदारांनी सर्वच नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. (वार्ताहर)>पक्षनिहाय मिळालेली मतेभाजपा : अ गट - नामदेव ढाके (१४०२), ब गट - माधुरी कुलकर्णी (११६७९), क गट - करुणा चिंचवडे (१४११६), ड गट - सचिन चिंचवडे (१२४४५)राष्ट्रवादी : अ गट - राजेंद्र साळुंखे (८४४९), ब गट - शोभा वाल्हेकर (६५४७), क गट - आशा सूर्यवंशी (८८९२), ड गट - भाऊसाहेब भोईर (१०२८९)शिवसेना : अ गट- सोंडकर चिंतामणी (३४१०), ब गट- मंगल वाल्हेकर (५५९६), क गट -रजनी वाघ (४५२४), ड गट - बाळासाहेब वाल्हेकर (३७४६) >चिंचवडमध्ये विद्यमानांना धक्केचिंचवड : प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेनेतून निवडणूक रिंगणात उतरलेले अनंत कोऱ्हाळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गत निवडणुकीत मनसेमधून विजयी झालेले कोऱ्हाळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावडे यांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संदीप चिंचवडे हे पराभूत झाले. भाजपाचे उमेदवार सुरेश भोईर यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला.प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादीच्या शमीम पठाण यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका जयश्री गावडे यांनी या निवडणुकीत भाजपातून उमेदवारी मिळविली होती. त्या चांगल्या मतांनी विजयी झाल्या. याच प्रभागातून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गुरुबक्ष पहेलानी निवडणूक रिंगणात होते. भाजपाचे विद्यमान नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी त्यांचा पराभव करून विजय मिळविला.राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार यांचा पराभव झाला. भाजपाचे शैलेश मोरे यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा पराभव झाला. भाजपाचे सचिन चिंचवडे हे विजयी झाले. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आशा सूर्यवंशी यांनाही पराभवाचा धक्का बसला.