शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'व्होटर स्लिप' पोहोचल्याच नाहीत

By admin | Updated: February 22, 2017 13:58 IST

गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे काम महापालिका प्रशासनाचे सोमवार पर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही.

'व्होटर स्लिप' पोहोचल्याच नाहीतअमरावती : गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे काम महापालिका प्रशासनाचे सोमवार पर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही. अखेर शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना राजकीय पक्षांनी वाटलेल्या स्लिपवरच अवलंबून राहणे लागण्याची वेळ आली आहे. आज मंगळवारी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. अनेक भागांमधील मतदान केंद्रांचा घोळ अजूनही कायम आहे. मतदान केंद्रे न सापडणे आणि एकाच घरातील सदस्यांना वेगवेगळी मतदान केंद्रे मिळणे हा अनुभव यंदाही आला. निवडणुकीपूर्वी मतदारांना मतदान केंद्राचा तपशील पुरविणाऱ्या मतदार स्लिप पूर्वी राजकीय पक्षांच्या यंत्रणांमार्फत घरोघरी वाटण्यात येत असत. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये प्रशासनाने हे काम आपल्या हाती घेतले. मात्र, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांना पत्ते शोधण्यात येणाऱ्या अडचणीांुळे हे काम पूर्ण होत नाही, असे यापूर्वी आढळून आले आहे. हाच अनुभव यंदाही मतदारांना येत आहे. हजारो कुटुंबांमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या स्लिप पोहोचलेल्या नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये घरोघरी आपल्या नावाने स्लिप वाटल्या, त्यांचा मतदारांना उपयोग होणार आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन स्लिप देणार असल्याने उमेदवारही त्या भरवशावर राहिले. त्यामुळे अनेक मतदार केंद्रांबाबत अनभिज्ञ राहिले. शहरातील सव्वा ते दीड लाख कुटुंबांकडे मतदार स्लिप वाटण्याचे काम ४ दिवसांपूर्वी करण्यात आले. त्यासाठी लिंक वर्करसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. मात्र प्रभागाचा पसारा पाहता व्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. (प्रतिनिधी)केंद्राचा घोळ कायम४मतदार यादीत नावे नोंदविणे आणि त्यांना क्रमांक देण्याचा जुनाच पायंडा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान एका केंद्रात आणि काही जणांचे दुसऱ्या केंद्रात अशी स्थिती अनुभवास मिळाली. तसेच यंदा प्रभागाचा आकार वाढल्याने मतदान केंद्र दूर असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका प्रशासनाला दर पंचवार्षिकप्रमाणे यंदाही वेळेत मतदार स्लिप वाटण्यात अपयश आले. तसेच मतदार यादीमधील घोळामुळे मतदारांच्या उत्साहावर पाणी फेरले. शहरात अनेक ठिकाणी प्रभागाच्या सीमेवर राहणऱ्या शेकडो नागरिकांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून गायब झाल्याचे दिसून आलेत.