शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विटावा स्कायवॉकचा खर्च २०.५८ कोटी

By admin | Updated: September 22, 2016 03:30 IST

विटावा ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत स्कायवॉक उभारण्याच्या कामाला अखेर सुमारे दोन वर्षांनंतर सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत.

अजित मांडके,

ठाणे- विटावा ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत स्कायवॉक उभारण्याच्या कामाला अखेर सुमारे दोन वर्षांनंतर सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत. एमएमआरडीएने या कामासाठी २० कोटी ५८ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत.कळवा-मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेव्हा मंत्रीपद मिळाले होते, तेव्हा त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती दिली होती. त्या वेळेस त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांत या स्कायवॉकचे काम पूर्ण होणार होते. परंतु, दीड वर्ष उलटल्यानंतर आता खऱ्या अर्थाने या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विटावा ते ठाणे स्टेशन यायचे झाल्यास येथील रहिवाशांचा कमीतकमी २५ ते ३० रुपयांचा दिवसाचा खर्च कमी होणार आहे. येथून येणाऱ्या परिवहनच्या बसची संख्या कमी असल्याने येथील रहिवाशांना त्यामुळे शेअर रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सध्या चित्र आहे. रिक्षा पकडून कळवानाका, नंतर ठाणे स्टेशन गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळदेखील अधिकच खर्र्च होत आहे. परंतु, या स्कायवॉकमुळे येथील रहिवाशांचा किंवा प्रवाशांचा वेळ वाचणार असून अवघ्या तीन ते पाच मिनिटांत त्यांना पायी स्टेशन गाठता येणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि वाहतूककोंडीतून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे त्याचे काम सध्याच्या घडीला पूर्णत्वाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु, सुमारे दीड वर्ष या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता अखेर एमएमआरडीएने या कामासाठी आॅनलाइन निविदा काढल्या असून यासाठी २० कोटी ५८ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार, आता या निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या दोन महिन्यांत किंवा ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्याच्या कामाचा नारळ फुटेल, असे काहीसे चित्र आहे. ।भूमिपूजनानंतर दोन वर्षेहा स्कायवॉक एका बाजूने कळवा आगार खाडी ते दुसऱ्या बाजूने सिडको खाडी असा दोन खाडीच्या प्रवाहांतून उभारला जाणार असून सुमारे ३ किमीचा तो असणार आहे. विशेष म्हणजे १४ डिसेंबर २०१४ रोजी या स्कायवॉकचे भूमिपूजन आव्हाडांच्या हस्ते झाले होते.