शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पवार-मुख्यमंत्री भेट

By admin | Updated: October 3, 2016 05:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उभय भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उभय भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी झालेल्या या भेटीचा अधिकृत तपशील बाहेर आला नसला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी झालेल्या या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचे कळते. राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चांनी राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. दिवाळीनंतर मुंबईतही विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत आरक्षणाच्या निर्णयावर तोडगा निघावा असा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटी घेऊन मराठा मोर्चांसंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्याचवेळी शरद पवार यांच्या भेटीची वेळ ठरविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास सरकार तयार आहे, परंतु चर्चेसाठी कुणीही पुढे येत नसल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सांगितले आहे. तर आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर १३ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात !मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास सरकार तयार आहे, परंतु चर्चेसाठी कुणीही पुढे येत नसल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सांगितले आहे. आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.