नाशिकच्या बिल्डरांची बांधकाम विकास नियंत्रण नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेटनाशिक : शहरातील बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीबाबत नाशिकमधील बांधकाम व्यवसायिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (दि़२७) भेट घेऊन चर्चा केली़मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील बांधकाम विकास नियंत्रण नियमावली संदर्भात बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या़ तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले़ यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, शिक्षक आमदार अपुर्व हिरे यांच्यासह शहरातील बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते़
नाशिकच्या बिल्डरांची बांधकाम विकास नियंत्रण नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट
By admin | Updated: February 27, 2017 17:34 IST