शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सातवाहनकालीन ‘तगर’ नगरीचे घडणार दर्शन

By admin | Updated: November 28, 2014 00:59 IST

भारताचा प्राचीन इतिहास हा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. प्राचीन काळात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील देशांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावलीत.

आनंद डेकाटे - नागपूरभारताचा प्राचीन इतिहास हा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. प्राचीन काळात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील देशांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावलीत. काही जमिनीच्या आत गडप झालीत. प्राचीन काळातील असेच एक शहर जमिनीच्या आत गाडले गेले. उत्खननाद्वारे ते बाहेर काढून त्याचे दर्शन घडविण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे. ते ऐतिहासिक प्राचीन औद्योगिक शहर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय. संत परंपरा लाभलेले हे स्थळ भारतातील प्राचीन प्रगत शहरांपैकी एक होते. उस्मानाबादवरून केवळ ३२.१९ कि.मी. अंतरावर असलेले ‘तेर’ हे सातवाहन काळात ‘तगरनगरी’ म्हणून विख्यात होते. इ.स. पूर्व २ ते ३ रे शतकातील हे शहर असून तेव्हा भारताचा रोमबरोबर व्यापार चालायचा. रोममधून भारतात सोने आणि मद्य आयात केले जात होते. तर भारतातून मसाल्याचे पदार्थ निर्यात व्हायचे. तेव्हा तगर नगरी हे भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र होते. उत्खननाद्वारे हे शहर बाहेर काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. राज्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यात राज्यातील संपूर्ण पुरातत्त्व विभाग मिळून काम करणार आहे. येथील उत्खननासाठी राज्य पुरात्व विभागातर्फे केंद्रीय आॅर्कियोलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात होईल. राज्यातील पुरातत्त्व विभागाने उत्खननाची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. सातवाहनकालीन तगर नगरीतील वसाहतीचा होत गेलेला विकास, विस्तार आणि इतर विविध पैलूंवर उत्खननाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. हडप्पासारखे प्रगत वसाहतीचे अवशेष या ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तेर येथे उत्खनन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्राचीन काळातील तगर नगरीचे दर्शन करण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.