शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

विरारची जीवनदायी जीवदानी माता

By admin | Updated: October 8, 2016 02:26 IST

भारतभर एकूण ४९ शक्तिपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एकेक अशी एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.

- शशी करपेभारतभर एकूण ४९ शक्तिपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एकेक अशी एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. एकट्या महाराष्ट्रात १८ शक्तिपीठे आहेत. त्यात विरारची जीवदानी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. विरार रेल्वे स्टेशनपासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर मातेचे वास्तव्य आहे. मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत. फार पूर्वी जीवदानी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात एक गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे. पण, ती गाय कोणाची, हे काही त्याला समजले नाही. एक दिवस तो शेतकरी त्या गायीपाठोपाठ जाऊ लागला. डोंगरावर एका मैदानात गाय थांबली. त्याच क्षणी एक तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी. त्याने लागलीच त्या स्त्रीजवळ इतक्या दिवसाच्या चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो शेतकरी म्हणाला, बाई मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस. शेतकऱ्याच्या तोंडून हे शब्द निघतात न् निघतात तोच ती स्त्री अदृश्य झाली. त्याच क्षणी तेथे असलेल्या गायीने हद्य विदारक हंबरडा फोडला आणि तिने कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिले. गायीच्या बलिदानाचे रहस्य अजूनही कोणालाही उलगडलेले नाही. पण, तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणूनच या डोंगराला जीवदानीचा डोंगर व डोंगरावर वसणारी आदिमाता जीवदानी म्हणून सर्वमुखी झाली. जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गडावर सतराव्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. महाराष्ट्रात गडकोट किल्ला व भुईकोट किल्ले आहेत. त्यापैकीच हा एक गडकोट किल्ला होता. आज तटाचे काही कोरीव दगड पाहावयास मिळतात. या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने चढाई केली होती. त्या वेळी गडावर अवघे १०० मावळे होते. फिरंग्यांच्या सैन्यापुढे टिकाव लागणार नाही, म्हणून ते अन्य दुर्गम मार्गाने किल्ला सोडून निघून गेले. त्यानंतर, चिमाजी अप्पांनी बरवाजी ताकपीर या सरदाराला पाठवून ३१ मार्च १७३९ रोजी किल्ला सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून या किल्ल्याला त्या काळी विशेष महत्त्व होते. >१९४६ पर्यंत गुराख्यांकडून शिळापूजनजीवदानीमातेच्या गडावर केव्हापासून वास्तव्य आहे, याची माहिती उपलब्ध नाही. आख्यायिकेत सांगितल्यानुसार जेथून गायीने उडी घेतली, त्या शैलशिखराच्या छोट्याशा सपाट जागेत एक तांदळा (अष्टविनायकाच्या स्वरूपातील मूर्तीचे रूप) ठेवलेला होता. भाविक त्याचीच पूजा करीत असत. गावातील भाविक गडावर जाण्यापूर्वी गुराखीच शिळेचे पूजन करीत असत. साधारणपणे १९४६ पर्यंत हीच स्थिती होती. १९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नित्यनेमाने पूजा करीत असे. १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.