शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित

By admin | Updated: July 9, 2017 17:44 IST

शासकीय हेलिकॉप्टरमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रायगड येथील हेलिकॉप्टर घटनेनंतर व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शासकीय हेलिकॉप्टरमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.  व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचे मार्गदर्शक तत्त्वं आणखी काटेकोर करुन निर्णय घेणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले. त्याचबरोबर, डीजीसीएकडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस (शुक्रवारी) अलिबाग दौऱ्यावर होते. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि सहकारी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन उरकून मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.

आणखी वाचा - 

 हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले! 

VIDEO : ट्रक आणि घरावर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर

 अलिबागवरून कार्यक्रम उरकून मुंबईला निघण्याकरता ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक आॅफ घेतला. हेलिकॉप्टरचा पंखा देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला लागणार तोच उपस्थित सुरक्षारक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते बालंबाल बचावले. या माहितीला प्रत्यक्षदर्र्शींनी दुजोरा दिला.

 मुख्यमंत्री कार्यालयाकडून इन्कार

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करून फॅनची रिटेस्ट घेण्यात आली. त्यानंतर त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री मुंबईस सुखरूप रवाना झाले.

 

लोकमत वेबसाइटवर प्रथम

 मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची ब्रेकिंग न्यूज ‘लोकमत डॉट कॉम’वर झळकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त आले.

 काळजाचा ठोका चुकला

गेल्या २५ मे रोजी निलंगा येथे खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या अपघातातून मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकारी बालंबाल बचावले होते. त्यामुळे शुक्रवारच्या प्रसंगाने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.