शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

विनय कोरे भाजपाच्या संपर्कात

By admin | Updated: July 21, 2014 02:45 IST

जनसुराज्य शक्ती पक्षाचे पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत

विश्वास पाटील, कोल्हापूर जनसुराज्य शक्ती पक्षाचे पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत; परंतु भाजपातील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही कोरे यांच्यावर काहीतरी निर्णय घ्या, असा दबाव आहे. कोरे यांनी भाजपाचे नेते व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. भाजपाने त्यांना प्रवेश दिल्यास विधानसभेचा गुंताही सुटू शकतो. एकाचवेळी भारत पाटील व सत्यजित पाटील यांचा शिवसेना उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो.विकासाची दृष्टी, नेतृत्वगुण, चांगले संघटन असूनही कोरे यांचे नेतृत्व सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. पक्ष चालविणे हे आर्थिकदृष्ट्या न झेपणारे बनले आहेच, शिवाय स्वत: त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेला संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते भारत पाटील हे स्वाभिमानी किंवा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील हेदेखील शिवसेनेतूनच लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज ठाकरेंशी चांगले संबंध असल्याने कोरे यांना शिवसेनेत जाण्यात अडचणी आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर त्यांना काँग्रेसमध्ये येऊ नका, असाच सल्ला दिल्याचे समजते. नितीन गडकरी व कोरे यांचे १९९५ पासून घनिष्ट संबंध आहेत. मुंबईत एकाच अपार्टमेंटमध्ये या दोघांचे फ्लॅट असल्याने त्यांची अनेकदा भेट होते. आर्इंची प्रकृती बरी नसल्याने कोरे गेला दीड महिना मुंबईत होते. या काळात त्यांच्या दोन-तीन वेळा भेटी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही कोरे यांचे खूप जुने संबंध आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील एखादा खमका नेता पक्षात येत असेल तर भाजपालाही ते हवेच आहे. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडून आले. गेल्या निवडणुकीत ही संख्या दोनवर आली. त्यातील मालेगावचे आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जनसुराज्यकडे पन्हाळा पंचायत समिती व नगरपालिकेची सत्ता आहे.