शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

परळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे ग्रामस्थांनी लावले लग्न

By admin | Updated: December 31, 2015 01:00 IST

तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी

परळी : तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी ठरलेल्या दिवशी रितीरिवाजाप्रमाणे लावण्यात आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी गावकऱ्यांनीच मदतीचा हात पुढे केला.भाग्यश्रीचा विवाह बेलंबा येथील बाबूराव गित्ते यांचे चिरंजीव तुकाराम, तर राजश्रीचा विवाह चांदापूर येथील सटवाजी गित्ते यांचा मुलगा मुक्ताराम सोबत पार पडला. दोन वर्षांपासून शेतात काहीच न पिकल्याने उपवर मुलींचे लग्न कसे करावे, असा प्रश्न सातभाई यांच्यापुढे उभा होता. लग्नासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मिळाले नाही. त्यामुळे सातभाई यांनी १२ दिवसांपूर्वी तडोळी शिवारातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मुलींचा विवाह कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला. मात्र, ग्रामस्थांनी कुठल्याही स्थितीत ठरलेल्या वेळीच दोन्ही कन्येचा विवाह लावून सातभाई यांची इच्छापूर्ती करण्याचे ठरवले व त्यासाठी वर्गणी काढून सर्व जण कामाला लागले. यासाठी सरपंच अशोक सटाले, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी व परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली. २५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.या विवाहासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. धनादेश मंगळवारी लग्न मंडपातच मुलींच्या नातेवाईकांकडे देण्यात आला.धनंजय मुंडे यांच्याकडूनही मदतविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २५ हजारांची मदत दिली. विवाहाला ते स्वत: उपस्थित होते. सातभाई यांच्या तिसऱ्या मुलीच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.