शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनशेतमध्ये एक गाव एक बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:52 IST

वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय.

वाडा : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक गणेशोत्सवापैकी वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय. यावर्षी मंडळाने बेटी बचाओ; बेटी पढाओ चा संदेश दिला आहे. ‘आज मुलीचा जीव घेऊन उद्या सून आणाल कोठून’ असा प्रश्न या मंडळाने संदेशाद्वारे नागरिकांना विचारला आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या उत्सवाची सुरवात ऐनशेत गावात सन १९५३ साली झाली. ६४ वर्षापूर्वी कोणत्याही सोयी सुविधा नसताना नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना या गावातील काही होतकरू तरूणांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. प्रत्येकी १ रूपया २५ पैसे वर्गणी काढून हा गणेशोत्सव सुरू झाला. आज या गणेशोत्सवाने ६४ वर्षे पूर्ण केली. यासाठी गावकरी त्या पूर्वजांचे फक्त ऋणच व्यक्त करतात असे नाही तर या ६४ वर्षाच्या कालावधीपेक्षा त्यांनी स्थापन केलेल्या या उत्सवाने गावाला जे दिले. जी संस्कृती दिली त्याचे महत्व ग्रामस्थ व कार्यकर्ते अभिमानाने सांगतात. ६४ वर्षे अखंडपणे आणि एकोप्याने हा उत्सव साजरा होतो . गावातील ४ थी पिढी हा उत्सव साजरा करतेय. या चार पिढ्यांमध्ये या उत्सवाची कमान चढतीच राहिली आहे. सव्वा रूपये वर्गणीने सुरू झालेल्या गणेशोत्सवात आज रोजी सव्वा लाख रु पये वर्गणी स्वखुशीने व सढळहस्ते मंडळाच्या मंडपात ही वर्गणी आणून दिली जाते हे या उत्सवाचे यश आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने गावातील तरूणांना एकत्र यायला शिकविले एकत्र बसायला शिकविले बैठकीतून गावाच्या प्रगतीचे विकासाचे नियोजन करायला शिकवले ही संस्कृती या गावातील पूर्वजांनी या गावाला लावून दिली आहे. तेव्हाचा तरूण असाच एकत्र येऊन निर्णय घेत होता. आजही घेतोय. कारण संपूर्ण गावातील सर्व नागरिक एकत्र येण्याचा योग म्हणजे गणेशोत्सव आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने जसे तरूणांना एकत्र आणले लहान विद्यार्थ्यांनाही गोडी लावली. ज्येष्ठांना मार्गदर्शनाची संधी दिली. (वार्ताहर) >गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कारया उत्सवातून रक्तदान शिबिर, विविध नामवंताचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कार, गावातील ज्येष्ठांचा सत्कार, गरजवंताना मदत, गावातील आपदग्रस्तांना मदत, विद्यार्थाना बक्षिसे असे अनेक उपक्र म गेली ६४ वर्षे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहेत. यावर्षी बेटी पढाओ बेटी बचाओ चा संदेश देण्यात आला आहे. या मंडळाने अनेक पुरस्कार ही मिळवाले आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरेश्वर ठा।करे यांनी दिली आहे. >महिलांचा सक्रीय सहभागगणेशोत्सवातील महिलांचा सहभाग हे या गणेशोत्सवाचे वैशिष्टय आहे. समुह नृत्य असो, भजन असो, स्पर्धा असोत, सांस्कृतिक कार्यक्र म असोत किंवा एखादी जबाबदारी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा एक परिपाठ निर्माण झाला आहे. सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा गावात राहणारे कुणबी, वारली, कोळी, कातकरी समाजापैकी कोणतेही समाज या उत्सवापासून दूर राहात नाही. उत्सवाची आखणी करण्यापासून सर्वाचाच सहभाग असता अशी माहिती उत्सवाचे अध्यक्ष मोरेश्वर ठाकरे यांनी दिली.