शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

विजय दर्डा यांनी घेतले भारी गाव दत्तक

By admin | Updated: November 19, 2014 00:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा

सांसद आदर्श ग्राम : नागरिकांच्या सहकार्याने सर्वांगीण विकासयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळ तालुक्यातील भारी हे गाव दत्तक घेतले. नागरिकांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.केंद्र शासनाच्यावतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने या योजनेबाबतचे दिशानिर्देश जारी केले आहे. केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार विजय दर्डा यांनी भारी गावाची निवड केली आहे. जिल्हा ठिकाणापासून सात किलोमीटर अंतरावर भारी हे गाव आहे. मात्र विकासाच्या विविध योजना येथपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे खासदार विजय दर्डा यांनी या गावाची निवड केली आहे. भारी या गावातील नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी याबाबत माहिती दिली असून खासदार दर्डा लवकरच भारी गावाला भेट देणार आहेत. या गावात कोणकोणती विकास कामे करता येईल, याबाबत गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. संपूर्ण गावाच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला असून गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळवून देऊ, असे सांगितले. (नगर प्रतिनिधी)