शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विजय दर्डा यांनी दिल्या धोनी व सुशांत सिंग यांना शुभेच्छा

By admin | Updated: October 4, 2016 02:26 IST

क्रिकेटच्या मैदानावर संघाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेत असताना अनेक विक्रम नोंदविणाऱ्या एमएस धोनी याच्या जीवनावर आधारित एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी

क्रिकेटच्या मैदानावर संघाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेत असताना अनेक विक्रम नोंदविणाऱ्या एमएस धोनी याच्या जीवनावर आधारित एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पडद्यावरही विक्रम करेल, अशा शुभेच्छा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला दिल्या. मुंबई येथील हॉटेल ताज लँड एंड येथे ही भेट घडून आली. यावेळी पूर्णा प्रफुल पटेल याही धोनीला भेटल्या. ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट असून, माझ्या रिअल लाईफमधील संघर्ष रिल लाईफमध्ये अतिशय सुरेखपद्धतीने मांडला आहे असे सांगत हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरेल, अशा शुभेच्छाही यावेळी धोनीने दिल्या. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत धोनीने समाधान व्यक्त केले असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वत: नॉर्थइस्टला जाणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांबरोबर स्वत: महेंद्रसिंग धोनी उपस्थित राहत असल्याने चित्रपटाविषयीची लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची रेकॉर्डब्रेक ओपनिंग केल्याने हा चित्रपट 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवेल असा विश्वासही धोनीने व्यक्त केला.सुशांत सिंग राजपूतची लोकमतला भेटएम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सुशांत सिंग राजपूत याला त्याच्या या आगामी बायोपिकसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुडवीन ज्वेलर्सचे संचालक सुनील कुमार व सुधीश कुमार आणि लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते. क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला. 2011 मध्ये विश्वचषकावर भारताचे नाव कोरणारा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात सुशांत सिंग याने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.