शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा न दिल्याप्रकरणी चौकशी समिती

By admin | Updated: March 30, 2017 03:34 IST

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळाली नसल्याच्या मुद्यावरुन आज भाजपा

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळाली नसल्याच्या मुद्यावरुन आज भाजपा आणि शिवसेनेचे सदस्य विधानसभेत अतिशय आक्रमक झाले. शेवटी या प्रकरणी चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.नांदेड जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत २ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केळी पिकाच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून ३.२५ कोटी रुपये जमा करण्यात आले, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले. मात्र, अनेक शेतकरी या लाभापासून वंचित असल्याचा मुद्दा सुभाष साबणे, जयप्रकाश मुंदडा, योगेश सागर, हेमंत पाटील यांनी लावून धरला. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ हजार ३०७ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र नसल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांना मुद्दाम वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, चौकशीची घोषणा फुंडकर यांनी केली. तसेच २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून पीक विम्यामध्ये पीक निहाय समावेश करण्यात येईल, आणि नुकसान भरपाईचे पंचनामे करताना महसूल, कृषी आणि विमा कंपनीचे अधिकारी एकत्र प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही फुंडकर यांनी सांगितले. चंद्रकात पाटील यांचा प्रत्येक प्रश्नावर होकारसदस्यांनी मागणी केली आणि त्यावर लगेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागणी मान्य केली असे आज विधानसभेत तीनवेळा घडले. पाटील यांच्या तत्पर आश्वासनाचे सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.सातारा येथील करंजी नाकार ते महालक्ष्मी गोडवली रस्त्याचे नगरपालिका हद्दीतील काम भूसंपादन करून तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भाजपाचे सुरेश खाडे यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करून लगेच आश्वासन पदरात पाडून घेतले. संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील आरवली-माखजन रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, चिपळूण तालुक्यातील तांबी नदीवरील पुलाचे नव्याने बांधकाम केले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी सदानंद चव्हाण यांच्या प्रश्नात दिले. अतिवृष्टीतील मदतीत वाढ करण्याचा प्रस्तावअतिवृष्टीत नुकसान झालेल्या घराची भरपाई ही केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याचा किंवा या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.रायगड जिल्ह्यातील चांगेवाडी या आदीवासी वाढीतील पुरग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य मनोहर भोईर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कांबळे बोलत होते.