शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर मंत्रमुग्ध

By admin | Updated: November 1, 2016 14:04 IST

दिवाळीच्या आनंद पर्वात जर्मन कलावंत कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले.

‘प्रेरणास्थळ’ येथे सूरमयी दिवाळी पहाट
 
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १ -  दिवाळीच्या आनंद पर्वात जर्मन कलावंत कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘प्रेरणास्थळा’वरील प्रसन्न पहाटे वीणेतून झंकारलेले सूर थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. पखवाज वादक प्रबलनाथ यांनी तेवढ्याच ताकदीने कर्स्टन विके यांना साथसंगत केली. 
स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर मंगळवारी दिवाळी पहाट हा सूरमयी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कास्टर्न विके यांनी आपल्या वादनाची सुरूवात राग तोडीने केली. धीरगंभीर स्वरांचा नाद वातावरण भारावून गेले. तब्बल दोन तास वैशिष्ट्यपूर्ण स्वरांचा मेळ श्रोत्यांना वेगळी आनंद अनुभूती देत होती. या मैफलीत पखवाज वादक प्रबलनाथ यांनी अतिशय समर्पक आणि ताकदीने साथसंगत केली. कार्यक्रमाची सांगता भैरवी रागातील धृपद रचनेने झाली. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत मीडिया प्रा.लि. च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रुद्रवीणा वादक कर्स्टन विके आणि पखवाज वादक प्रबलनाथ यांचा सत्कार केला. यावेळी लोकमतचे चेअरमन देवेंद्र दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.