शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- बलात्कार करून मायलेकीचा खून करणाऱ्या दोघांना फाशी

By admin | Updated: August 17, 2016 16:31 IST

मायलेकीच्या दुहेरी हत्याकांड व बलात्कारप्रकरणी आरोपींना माजलगाव येथील सत्र न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी दिले दोषी करार

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 17 - धारुर तालुक्यातील चोरंबा येथील मायलेकीच्या दुहेरी हत्याकांड व बलात्कारप्रकरणी आरोपी कृष्णा रामराव रिडडे व अच्युत उर्फ बप्पा उर्फ बाबु कचरु चुंचे रा. चोरंबा या दोघांना माजलगांव येथील सत्र न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी दोषी करार केले असून, दोघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.चोरंबा येथे 28 मे 2015 रोजी 45 वर्षीय महिलेचा गळा दाबुन खून केला व तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचाही गळा दाबुन निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दिनांक 29 रोजी धारुर पोलीसांत कलम 449 , 354 ब , 376(2)(आय) , 302 सह कलम 34 भादंवि व कलम 4 बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजलगांव येथील जिल्हा सत्र न्यायाधिश एम.व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात आरोपितांविरध्द दोषारोप पत्र दाखल झाले होते. हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवुन दिनांक 16 आॅगस्ट रोजी वरील दोन्ही आरोपींविरुध्दचे आरोप सबळ पुराव्यानिशी सिध्द झाले असुन आरोपीना न्यायालयाने शिक्षेबददल विचारले असता त्यांच्या वकीलाने शिक्षेबाबत सांगण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागुन घेतल्याने आरोपीतांना शिक्षा देतांना त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. त्यानंतर आज बुधवारी दुपारी तीन वाजता शिक्षा सुनावण्यात आली. सदर प्रकरणी सहाययक सरकारी वकील अ‍ॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड. बी.एस. राख, अ‍ॅड. आर.ए. वाघमारे यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान माजलगांव न्यायालयात आज दिवसभर मोठया प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती त्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.