शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पुरात वाहून गेले ट्रॅक्टर, चौघेजण बचावले

By admin | Updated: September 22, 2016 21:17 IST

पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़

ऑनलाइन लोकमतऔराद शहाजानी, दि. २२ : तेरणा व मांजरा नदीस गुरुवारी पुन्हा पूर आला़ त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील या नद्यांच्या संगमावर पाणी वाढले असून पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर  पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़ 

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शेतकरी दिलीप काशिनाथ कत्ते यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एमएच २४, डी ५७१६) चालक लक्ष्मण कांबळे  गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास वांजरखेड्याहून औराद शहाजानीकडे घेऊन निघाला होता़ ट्रॅक्टरमध्ये मारुती वाघे, सुभाष वाघमारे आणि भरत मेहकरे हे चौघे बसले होते़ दरम्यान, मांजरा- तेरणा नदीच्या संगमावरील पुलावरुन पाणी वाहत होते़ पुराचे पाणी कमी असल्याचे पाहून चालक कांबळे हा ट्रॅक्टर पुढे घेऊन निघाला़ पुलाच्या खोलगट बाजूवर गेला असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ट्रॅक्टर उलटले़ पाणी वाढल्याचे पाहून या चौघांनीही उड्या मारल्या आणि पोहत पाण्याबाहेर पडले़ 

पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूऱ़़औराद शहाजानी परिसरात सलग तिसऱ्याही दिवशी जोरदार पाऊस झाला़ तेरणा नदीवरील किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गुंजरगा, तगरखेडा या उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे गुरुवारी सकाळी उघडण्यात आली आहेत़ त्यामुळे तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे़ तसेच मसलगा प्रकल्प व धनेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने मांजरा नदीसही पूर आला आहे़  या नद्यांवरील हालसी, तुगाव, औराद- वांजरखेडा पुलावर पाणी आल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे़

शेतकरी अडकला़तेरणा व मांजरा संगमानजीक औराद शहाजानी येथील रामदास खरटमोल यांची शेती आहे़ ते गुरुवारी शेतात गेले असता अचानक दोन्ही नद्यांना पुर आल्याने ते शेतातच अडकून पडले आहेत़ रात्री उशीरापर्यंत ते शेतातून बाहेर आले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले़