शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नातेवाईकांनाच करावी लागते रुग्णांची स्ट्रेचरवरून ने-आण!

By admin | Updated: October 3, 2016 19:27 IST

पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 3-  पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात  रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी व वार्ड बॉय असतानाही रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना  एका वार्डमधून दुसºया वार्डमध्ये हलविण्याचे काम त्यांच्या नातेवाईकांनाच करावे लागते. रुग्णाचे नातेवाईकच रुग्णाला स्ट्रेचरवरून ने-आण करीत असल्याचे चित्र या रुग्णालयात नेहमीच पहावयास मिळते.
सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्ह्यासह लगतच्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज उपचारार्थ दाखल होतात. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; परंतु येथे रुग्णांची हेळसांड होते. अपघात कक्षात रुग्णाची नोंद झाल्यानंतर तेथून त्यांना संबंधित वार्डमध्ये स्ट्रेचरवरून हलविण्यासाठी रुग्णालयात वार्ड बॉय, परिचरांची नियुक्ती आहे. परंतु, हे सेवक रुग्णालयात उपस्थितच नसतात. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून रुग्णांना हलवावे लागते. अपघात कक्ष ते अतिदक्षता विभागापर्यंतचा रस्ता गुळगुळीत नसल्याने स्ट्रेचरला हादरे बसतात. परिणामी रुग्णाला त्रास सहन करावा लागतो.