शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: - पोतराजांच्या गावात 'पोतराज' आणावे लागतात बाहेरून !

By admin | Updated: July 31, 2016 13:45 IST

पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले.

प्रताप नलावडेबीड, दि. ३१ - पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. गावातील लोकांचे सामाजिक संस्थांनी केलेले प्रबोधन आणि नव्या पिढीने रूढीच्या बंधनातून स्वत:ची जाणीवपूर्वक केलेल्या सुटकेमुळे आता गावात पोतराज राहिलेलेच नाहीत.अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा गावापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर केरूळ हे अगदी छोटेखानी गाव आहे. गाव शंभर उंबऱ्याच. अगदी वीस वर्षापूर्वी गावातील प्रत्येक घरातून एक पोतराज म्हणून देवीची भक्ती करायचा. अंगाभोवती रंगीबेरंगी चिंध्या गुंडाळून कपाळावर कुंकवाचा भला मोठा मळवट आणि वाढलेल्या जटांचा हा पोतराज स्वत:ला यातना देत देवीची भक्ती करतो. उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारून केली जाणारी ही देवीची सेवा अंधश्रध्देतून आलेली. परंतु एक मोठा समाजाच यात अडकलेला.

केरूळा या गावातही अशाच अंधश्रध्देतून प्रत्येक घरातून एक पोतराज झालाच पाहिजे, असा वर्षा न् वर्षाचा दंडक. परंतु गावात अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. याशिवाय सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने गावातील लोकांनी आणि विशेषत: तरूणांनी स्थलांतर केले आणि पोतराज प्रथेपासून गाव मुक्त झाले. तरीही श्रध्देचा भाग म्हणून गावात आषाढ महिन्यात मरीआईची पूजा मांडलीच जाते. यासाठी मग गावात पोतराज नसल्याने आजुबाजुच्या गावातून पोतराजांना पाचारण केले जाते. 

यावेळीही असेच घडले. मरीआईच्या पूजेसाठी नगर आणि इतर ठिकाणाहून पोतराजांना गावात आणले गेले. परंतु एकेकाळी पोतराजांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची ही ओळख तरी आता पुसली गेली असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना हायसे वाटते.