शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

VIDEO : मतमोजणीवरून विरोधक आक्रमक, न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: February 26, 2017 17:55 IST

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 26 - महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले ...

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 26 - महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजापाविरोधातच एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाने निवडणूक प्रक्रिया प्रभावित करून लोकशाहीविरोधी कृत्य करून सत्ता मिळविल्याचा आरोप करून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे पुरावे गोळा केले असून, या पुराव्यांसह याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.हुतात्मा स्मारक येथे पाराभूत उमेदवारांनी रविवारी (दि.२६) बैठक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्यासाठी कोर कमिटीची स्थापना केली असून या प्रकरणी सर्वपक्षीय उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. कें द्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने लोकशाही प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांना हद्दपार करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे निवडणुकी प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये घोळ करून अनेक मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याचप्रमाणे इव्हीएममशीनमध्येही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे. इव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात कुचराई झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला असून निवडणूक आयोगाच्या नियोजनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत ३ मार्च रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळयासमोर सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगा विरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय उमेदवारांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपाकलिके साठी पुन्हा मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात येणार असून यावेळी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीचे आयोजक डॉ. डीएल कऱ्हाड, संजय अपरांती यांच्यासह सर्व ३१ प्रभागांमधील पराभूत उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांपैकी २२ जणांच्या कोर कमिटीची स्थापना करण्यात आली असूनही कोर कमिटी निवडणूक अयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)  

https://www.dailymotion.com/video/x844svs