शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : विद्यार्थ्यांनी बनवली चिऊ ताईंसाठी घरटी

By admin | Updated: April 22, 2017 14:58 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 22 -  पर्यावरण मित्र, चिवचिव मंडळ, राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण, शिक्षण केंद्रच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वसुंधरादिनानिमित्त ...

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 22 -  पर्यावरण मित्र, चिवचिव मंडळ, राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण, शिक्षण केंद्रच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वसुंधरादिनानिमित्त चिमण्यांसाठी  कृत्रिम घरटी बनवली आहेत. जिल्हा परिषद शाळा कामरगावच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण मित्र गोपाल खाडे, निता तोडकर यांनी या दिनाचे आयोजन केले होते. सगळ्यात आधी गोपाल खाडे, नितीन तोडकर यांनी घरटी बनवण्याची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता वापरुन पृष्ठाच्या खोक्याचे, टाकाऊ वस्तूंचा वापर करुन विविध आकार रुपात व रंगात घरटी बनवली. 
 
विद्यार्थ्यांनी फक्त घरटी बनवून त्यावर विविध पर्यावरण संदेशही लिहिले. यामध्ये वसुंधरेला वाचवा, पाणी, हवा, प्रदुषित करू नका, निसर्गाचा समतोल ढळू देऊ नका, झाडे, प्राणी पक्षांवर प्रेम करण्याचे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.  पक्षी हा वसुंधरेचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने वसुंधरेला नक्कीच ही भेट आवडेल यात शंकाच नाही. वसुंधरादिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी बनवलेली घरटी आता परिसरात लावणार आहेत. 
 
यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागणार असल्याचे मत मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी निर्मला शेरेकर, विलास रुईकर, संजीवनी सोळंके, माधुरी दुधे, ममता जयस्वाल, पुष्पा व्यवहारे, अंजु भोयर, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीसेही देण्यात आली. विश्वास सोनावणे, साक्षी लाकडे, पायल भजभुजे अशी विजेत्यांची नावं आहेत.  तर  प्रोत्साहन म्हणून समीक्षा नागोसे, गौरव कानतोडे, निकसी मेश्राम, भुषण अंभोरे, मृणालीनी जुननकार व काळे यांना सन्मानीत करण्यात आले.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844vzr