शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

व्हिडीयो - वरळीच्या नाल्यात उतरून राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: May 13, 2016 17:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी 13 मे रोजी वरळी येथील नाल्यामध्ये उतरत नालेसफाई संदर्भात आंदोलन केले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी 13 मे रोजी वरळी येथील नाल्यामध्ये उतरत नालेसफाई संदर्भात आंदोलन केले. यावेळी अशोक धात्रक उपाध्यक्ष (प्रशासन) यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

(व्हिडीयो सुशील कदम)

काय आहे मुंबईतल्या नालेसफाईचा प्रश्न...
 
- नाल्यांच्या सफाईतून ठेकेदारांनी पालिकेच्या तिजोरीची सफाई केल्यानंतरही प्रशासनाला अद्याप शहाणपण आलेले नाही़ यंदाही गाळ टाकण्याच्या जागेचा पत्ता नसताना ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे, मात्र स्थायी समितीने यास विरोध करीत हा प्रस्ताव राखून ठेवला़ त्यामुळे शहर भागातील नालेसफाईची कामे टांगणीवर पडली आहेत.
 
- नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिकेकडे जागा नसल्याने ही जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहे़ मात्र ठेकेदारांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे गेल्यावर्षी चौकशीतून उजेडात आले़. सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्यानंतर पालिकेने ठेकेदारांवर कारवाई केली़, यामुळे नवीन ठेकेदार मिळण्यास अडचणी.
 
- नाल्यांतून काढलेला गाळ ठेकेदार कुठे टाकणार, याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे़ याबाबत माहिती विचारल्यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख निरुत्तर.
 
- मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नदींची एकूण लांबी ६५० कि़मी़ आहे़ यापैकी शहरात १०९ कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये २३० कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३११ कि़मी़ लांबीचे नाले आहे़त.
 
- २०१६ ते २०१८ पर्यंत असे दोन वर्षांचे शहर भागातील नालेसफाईचे कंत्राट देण्यात येणार आहे़, यासाठी १२ कोटी ७५ लाख रुपये राखून ठेवण्यात आले आहे़त.
 
- नालेसफाईचा गाळ टाकण्यासाठी मुंबईबाहेरील ग्रामपंचायतीचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र देऊन ठेकेदारांनी पालिकेला फसवले़ हा घोटाळा उघड झाल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली़.