शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज

By admin | Updated: July 29, 2016 14:27 IST

देशभरातील आदिवासींच्या नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकलेचा जागर करणाऱ्या आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे

राष्ट्रीय जागर : आदिवासी नृत्य, नाट्य, संगीताची तीन दिवस पर्वणी; हस्तकलांनाही व्यासपीठऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २९ -  देशभरातील आदिवासींच्या नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकलेचा जागर करणाऱ्या आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे. आजपासून (दि. २९) तीन दिवस नाशिकमध्ये हा राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव रंगणार असून, यानिमित्त सोळा राज्यांतील चारशेहून अधिक कलावंतांचा कलाविष्कार पाहण्याची पर्वणी नाशिककरांना लाभणार आहे.राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) नवी दिल्ली आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जुलै या कालावधीत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांचा कलाविष्कार एकाच रंगमंचावर अनुभवण्याची संधी नाशिककरांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. नाशकात पहिल्यांदाच होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील १६ राज्यांमधील ४०४ आदिवासी कलावंत सहभागी होऊन कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यांत आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, त्रिपुरा, मणिपूर आदि राज्यांतील आदिवासी कलावंतांचा समावेश आहे. महोत्सवात ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य व नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावर दोन दिवस परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर आदिवासींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन तिन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार असून, त्यात विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तीनही दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात आदिवासी कला व कलाप्रकारांचा परिचय करून दिला जाणार असल्याची माहिती एनएसडीचे संचालक वामन केंद्रे यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी दिवसभर या महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू होती. दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या आवारात आदिवासींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीचे सुमारे २५ स्टॉल्स लावले जाणार आहेत. खास आदिवासी पाड्यांवर दिसणाऱ्या झोपड्यांचा लूक या स्टॉल्सना देण्यात येणार आहे. हे स्टॉल्स उभारण्याचे काम सुरू होते. महोत्सवासाठी सर्व ४०४ कलावंत नाशकात दाखल झाले असून, त्यांची रंगीत तालीम दिवसभर सुरू होती. आज होणार उद्घाटन..या महोत्सवाचे आज सायंकाळी ७ वाजता प्रख्यात अभिनेत्री हिमानी शिवपुरी, ‘एनएसडी’चे संचालक वामन केंद्रे, महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.